Tapasi Pannu Rashmi Rocket and much more The film releasing today  Dainik Gomantak
मनोरंजन

तापसीच्या 'रश्मी रॉकेट' पासून शहनाजच्या 'हौसला राख' पर्यंत हे चित्रपट होणार रिलीज

आज ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट तुमचे मनोरंजन करणार आहे.

दैनिक गोमन्तक

जर तुम्हाला नवीन आणि वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट (Movie) पाहण्याची आवड असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे तुमच्या आवडत्या व्यक्तिसह तुम्ही चित्रपट पाहण्याचा आनंद घेवू शकता. कारण नेटफ्लिक्स (Netflix), अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ( Amazon Prime Video), डिज्नी प्लस हॉटस्टार(Disney Disney Plus Hotstar) आणि झी 5 सारखे ओटीटी प्लॅटफॉर्म आज दर्शकांसाठी मनोरंजनाचा खजिनाचा उघडणार आहे. चला तर मग पाहूया आज कोणते चित्रपट कुठे रोलीज होत आहेत.

* नेटफ्लिक्स

नेटफ्लिक्सवर 6 चित्रपट आणि मालिका रिलीज होत आहेत. यात लहान मुलांच्या आवडत्या कोकोमेलन, कर्मा वर्ल्ड, लिटल थिंग्ज चा सीझन 4, माय नेम, पॉवर रेंजर्स डिनो फ्युरी'चा सीझन 2 आणि अधिक सीझन 3 यांचा समावेश आहे. 'यु' चा समावेश आहे. यातील सर्वात जास्त चर्चा होत आहे की 'लिटिल थिंग्स' आणि 'यु' या दोन्ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

* झी 5

तापसी पन्नूचा 'रश्मी रॉकेट' चित्रपट झी 5 वर आज प्रदर्शित झाला. या चित्रपटात तापसी पन्नू एका धावपटूची भूमिका साकारली आहे. तिला क्रीडा स्पर्धेबरोबरच लिंगभेदाचासारख्या अडथळ्यामधून जावे लागते. तापसी व्यतिरिक्त, अभिषेक बॅनर्जी, प्रियांशु पैन्युली, सुप्रिया पाठक आणि सुप्रिया पिळगावकर सारख्या कलाकारांचा समावेश आहे.

* डिज्नी प्लस हॉटस्टार

विद्युत जामवाल यांच्या "सनक" चित्रपटाचा डिज्नी प्लस हॉटस्टार आज प्रीमियर झाला आहे. विद्युत जामवाल शिवाय चित्रपटात चंदन राय सन्याल, रुक्मणी, नेहा धुपिया सारख्या कलाकारांचा समावेश आहे. एखाद्या चित्रपटात विद्युत जामवाल असेल अआणि त्यात अॅक्शन सीन्स नसेल असे होऊच शकणार नाही. त्यांच्या इतर चित्रपटाप्रमाणे, विद्युतनेही या चित्रपटात अॅक्शन सीन केले आहेत.

* रंगमंच

प्रेक्षकांची बऱ्याच काळापासून शहनाज गिलला मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा होती आणि त्यांची इच्छा आता पूर्ण झाली आहे. कारण शहनाज गिल, दिलजीत दोसांझ आणि सोनम बाजवा यांचा 'हौसला राख' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. आज हा चित्रपट थेटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. दसऱ्याची सुट्टी आज अनेक प्रेक्षक चित्रपटगृहात चित्रपटचा आनंद घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Moths: फुलपाखरांसारखे दिवसा दिसत नसले तरी, रात्री बाहेर पडणाऱ्या 'पतंगांचे' स्थान महत्वाचे आहे..

Goa Assembly Live: तिसरा जिल्हा; मुख्यालयावरून आल्टन आक्रमक

IND vs ENG: मँचेस्टर कसोटी अनिर्णित, पण टीम इंडियाच्या नावावर लज्जास्पद विक्रम; 90 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं

Goa Monsoon Vegetables: चिप्स, बर्गर, पिझ्झा नको! गोव्यातील विद्यार्थ्यांनी घेतला पावसाळी रानभाज्यांचा आस्वाद

"गोयेंचो ताजमहाल सेंचुरी करता" कला अकादमीला आणखीन 20 कोटींचा खर्च; अधिवेशनापूर्वीच विजय सरदेसाईंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT