SC Slams Ekta Kapoor: निर्माता एकता कपूर आणि तिची आई निर्माती शोभा कपूर या गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत. त्यांच्या ऑल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रसारित होणाऱ्या XXX या वेबसीरीजच्या सीझन 2 समोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीत. या वेबसीरीजवरून न्यायालयात काही काळापासून खटला सुरू आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेच या आक्षेपार्ह कंटेटसाठी एकता कपूरला फटकारले आहे.
वेबसीरीजच्या माध्यमातून आक्षेपार्ह दृश्ये दाखवल्यावरून सुप्रीम कोर्टाने, देशाच्या युवा पिढीची मने तुम्ही दुषित करत आहात, अशा शब्दांत एकता कपुरला सुनावले आहे. जर आणखी एखादी तक्रार त्यांच्याकडे आली दंड वसुल केला जाईल, असा इशाराही सुप्रीम कोर्टाने एकताला दिला आहे.
सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश अजय रस्तोगी आणि न्यायाधीश सी.टी. रवी कुमार यांच्या पीठाने म्हटले आहे की, तुमचा कंटेट सर्व ठिकाणी सहज उपलब्ध आहे. कुठूनही पाहता येऊ शकतो. लोकांना तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहात? तुम्ही सध्याच्या तरूणाईची मने दुषित करत आहात. त्यांच्यासमोर तुम्ही चुकीचा पर्याय देत आहात.
एकताच्या वकीलाचा युक्तीवाद
एकता कपूरकडून देशाचे माजी अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले की, वॉरंट विरोधात हायकोर्टातही एक याचिका दाखल केली आहे. पण तिथे लवकर सुनावणी होण्याची शक्यता नाही.
त्यावर एकताने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यावरूनही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तुम्ही वारंवार सर्वोच्च न्यायालयात येता, हे चांगले नाही, ही योग्य पद्धत नाही, अशा पद्धतीने याचिका दाखल केल्यास तुम्हाला दंडही ठोठावला जाऊ शकतो, असे कोर्टाने म्हटले आहे. तुम्ही चांगले वकील देऊ शकता याचा अर्थ हे न्यायालय केवळ तुमच्यासाठी आहे असे नाही. ज्यांचा आवाज ऐकला जात नाही, त्यांच्यासाठीही हे न्यायालय आहे.
नेमका वाद आहे काय?
बिहारच्या बेगूसराय येथील माजी सैनिक शंभू कुमार यांनी एकता कपूर विरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत म्हटले होते की, ऑल्ट बालाजीवरील वेबसीरीज XXX च्या सीझन 2 मध्ये एका सैनिकाच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह दृश्ये दाखवल्याने आमच्या कुटूंबाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यानंतर कोर्टाने एकताविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. त्या विरोधात एकताने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.