Highest IMDB Rated Indian Movie: 'या' भारतीय चित्रपटाला 'आयएमडीबी'वर सर्वाधिक रेटिंग

अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचे होतेय कौतूक; 14 ऑक्टोबरपासून देशभरात होणार प्रदर्शित
Kantara Movie
Kantara MovieDainik Gomantak

Highest IMDB Rated Indian Movie: भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या एक कन्नड चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'कंतारा.' ऋषभ शेट्टीचा हा चित्रपट इंटरनेट मुव्ही डेटा बेस (आयएमडीबी) रेटिंगमध्ये सर्वाधिक रेटिंग मिळविणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.

Kantara Movie
Shruti Hasan Nose Surgery: श्रुती हासनने दिली नाकावर सर्जरी केल्याची कबुली; म्हणाली...

कंतारा चित्रपटाला आयएमडीबीवर 10 पैकी 9.6 रेटिंग मिळाले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शनही ऋषभ शेट्टीनेच केले आहे. चित्रपटात सप्तमी गौडा, किशोर आणि अच्युत कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'केजीएफ २' या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे निर्मात्यांनीच या चित्रपटाचीही निर्मिती केली आहे.

कर्नाटकात ३० सप्टेंबर रोजी हा चित्रपट रीलीज झाला आहे. कर्नाटकात या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. कन्नड भाषेतच कर्नाटकबाहेरही हा चित्रपट रीलीज झाला होता, आणि त्यामुळेही हा चित्रपट चर्चेत आला होता. आता 14 ऑक्टोबरपासून हिंदी भाषेतही हा चित्रपट संपुर्ण देशभरात रीलीज होत आहे.

या चित्रपटाला बुक माय शो या वेबसाईटवर 100 पैकी 99 टक्के रेटिंग मिळाले आहे. 35 हजारहून अधिक रिव्ह्युज मिळाले आहेत. बुक माय शोच्या इतिहासात पहिल्यांदाच असे रेटिंग मिळाले आहे. मास एंटरटेन्मेट असलेल्या या चित्रपटाने सर्व स्तरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Kantara Movie
Bigg Boss Payment : 'बिग बॉस चाहते हैं...' हा रहस्यमय आवाज नेमका कुणाचा? त्याच्या पगाराचं गुपितही घ्या जाणून

यापुर्वी ज्ञानवेल दिग्दर्शित आणि सूर्या याने अभिनय केलेल्या 'जय भीम' या चित्रपटालाही आयएमडीबीवर 9 पेक्षा जास्त रेटिंग मिळाले होते. कालांतराने ते 8.9 इतके झाले. तर दिग्दर्शक हंसल मेहता आणि प्रतिक गांधी अभिनीत गाजलेल्या 'स्कॅम 1992 : द हर्षद मेहता स्टोरी' या वेबसीरीजला 9.3 टक्के रेटिंग मिळाले आहे.

आयएमडीबी हा एक फ्री मुव्ही डेटाबेस आहे. येथे जगभरातील चित्रपटाला प्रेक्षक आपल्या आवडीनुसार रेटिंग देत असतात. एखादा चित्रपट पाहण्याआधी अनेकजण आधी त्या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग तपासत असतात. आयएमडीबी रेटिंग चांगले असलेला चित्रपट मनोरंजक मानला जातो. त्यामुळे प्रेक्षकांसाठीही एखादा चित्रपट बघण्यासाठी हे रेटिंग सोयीचे ठरते. आयएमडीबी ही वेबसाईट जेफ बेझॉस यांच्या अॅमेझॉनच्या मालकीची आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com