The Kapil Sharma Show: सुमोना चक्रवर्तीचे पुनरागमन Instagram/@sumonachakravarti
मनोरंजन

The Kapil Sharma Show: सुमोना चक्रवर्तीचे पुनरागमन

सोनी वाहिनीने (Sony tv) एक विडिओ (Video) शेअर करत सुमोना शोचा एक भाग असल्याची माहिती दिली आहे.

दैनिक गोमन्तक

कॉमेडी किंग कपिल शर्मा (Kapil Sharma) त्याच्या शोचा तिसरा सीझन घेऊन परत येत आहे. द कपिल शर्मा शोची (The Kapil Sharma Show) लोक आतुरतेने वाट पाहत होते. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कपिल यावेळी आपल्या टीममध्ये अनेक नव्या लोकांना घेवुन येत आहे. शोच्या प्रोमोमध्ये सर्व कलाकारांची (Artist) ओळख करून दिली होती पण तेव्हा सुमोना (sumona chakravarti) चक्रवर्ती सहभागी नव्हती. त्यानंतर असे म्हटले जात होते की ती या सीझनचा भाग नसणार. पण आता सुमोनाने या सगळ्या अफवांवर पूर्णविराम लावला आहे. सुमोना चक्रवर्तीसुद्धा द कपिल शर्मा शोचा (The Kapil Sharma Show) भाग असणार आहे. चाहत्यांना शोमध्ये कपिलसोबत भारती सिंह, कृष्णा अभिषेक, किकू शारदा, चंदन प्रभाकर आणि सुदेश लाहिरी यांच्या उपस्थितीबद्दल आधीच माहिती देण्यात आली होती. सोनी वाहिनीने एक विडिओ शेअर करत सुमोना शोचा एक भाग असल्याची माहिती दिली आहे.

सुमोनाने केला फोटो शेअर

सुमोना चक्रवर्तीने आपल्या अधिकृत इन्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये (Photo) ती मेकअप (Makeup) टेबलसमोर बसलेली दिसत आहे. फोटो शेअर करत सुमोनाने( sumona) लिहिले की, हाय... तिच्या चाहत्यांनी या फोटोवर अनेक कमेंट केल्या आहेत. एक चाहत्याने (fans) लिहिले की- खूप दिवसांनी तुम्हाला पाहून आनंद झाला.

सोनी टीव्हीने व्हिडिओ केला शेअर

एकीकडे सुमोनाने सेटवरून तिचा फोटो शेअर केला आहे, तर सोनी वाहिनीने एक व्हिडिओ (Video) देखील शेअर (Share) केला आहे. ज्यामध्ये ती फॉर्मल लुकमध्ये दिसत आहे. ती व्हिडिओमध्ये शोचे प्रमोशन करता आहे. ती व्हिडिओमध्ये म्हणते की शो प्रसारित होण्यासाठी फक्त दिवस राहिलेले आहेत.

द कपिल शर्मा शोच्या तिसऱ्या सीझनचा पहिला पाहुणा अक्षय कुमार (Akshay Kumar) असणार आहे. अक्षय कुमार त्याच्या बेल बॉटम (Bell Bottom) या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहे. अक्षयनंतर अजय देवगण (Ajay Devgan) त्याच्या भुज (Bhuj) चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याच्या टिमसोबत येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT