Sudipto Sen In Hospital
Sudipto Sen In Hospital Dainik Gomantak
मनोरंजन

Sudipto Sen In Hospital : केरळ स्टोरीचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन रुग्णालयात...नेमकं काय झालंय?

Rahul sadolikar

'द केरळ स्टोरी'चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी आहे. सुदीप्तो सेन यांची प्रकृती अचानक बिघडली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 'द केरळ स्टोरी'मुळे सुदीप्तो सेन बऱ्याच दिवसांपासून व्यस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. व्यस्त वेळापत्रक आणि विश्रांतीचा अभाव यामुळे सुदीप्तो सेन यांची प्रकृती बिघडली.

सततचा प्रवास आणि आजारपण

सुदीप्तो सेन 'द केरळ स्टोरी'चे सतत प्रमोशन करत असून ठिकठिकाणी जात असल्याची माहिती आहे. सततच्या प्रवासामुळे त्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम झाला आहे. 'द केरळ स्टोरी' रिलीज झाल्यापासून वादांमुळे सुदीप्तो सेन खूप तणावाखाली असल्याचेही बोलले जात आहे. 

त्या वादाचा परिणाम सुदीप्तो यांच्या प्रकृतीवरही झाला आहे. सुदीप्तो सेन यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर चित्रपटाचे प्रमोशन आणि इतर गोष्टी थांबवण्यात आल्या आहेत.

केरळ स्टोरीवर बंदीची मागणी

'द केरळ स्टोरी'वर बंदी घालण्याची मागणी सातत्याने होत आहे आणि या चित्रपटाविरोधात ठिकठिकाणी निदर्शनेही झाली आहेत. मात्र असे असूनही 'द केरळ स्टोरी' बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. 

'द केरळ स्टोरी'वर यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली होती. मात्र तिथूनही बंदी उठवण्यात आली. हा चित्रपट आता पश्चिम बंगालमध्ये प्रदर्शित झाला आहे आणि तिथेही चांगली कमाई करत आहे.

'केरळ स्टोरी'ची छप्परफाड कमाई

5 मे रोजी रिलीज झालेल्या 'द केरळ स्टोरी'ने तीन आठवड्यात 194 कोटी रुपये कमवले आहेत, तर हा चित्रपट 15 ते 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता. या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या.

केरळ स्टोरीनंतर आता बंगाल डायरी

केरळ स्टोरीचा वाद ताजा असतानाच आता बंगालची गोष्ट सांगणारा 'डायरी ऑफ वेस्ट बंगाल' नावाचा चित्रपटही लवकरच रिलीज होत आहे. कालच (26 मे) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असुन या चित्रपटाने रिलीजआधीच वाद ओढवून घेतला आहे.

बंगालच्या पोलिस संचालकांनी या चित्रपटाला बंगालची प्रतिमा खराब करणारा चित्रपट असं म्हटलं आहे. या चित्रपटाने नवा वाद निर्माण होणार हे नक्की. या चित्रपटाची गोष्ट नेमकी काय आहे? हे जरी कळलं नसलं तरी हा वाद आधीच निर्माण झालाय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT