Prakash Raj Viral Video Dainik Gomantak
मनोरंजन

Viral Video: प्रकाश राज यांच्या वक्तव्यानं नवा वाद, पॅलेस्टाईनची केली काश्मीरशी तुलना; व्हिडिओ पाहून लोक संतापले

Prakash Raj Viral Video: दिग्गज अभिनेते प्रकाश राज पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी पॅलेस्टाईनची तुलना काश्मीरशी केली आहे.

Manish Jadhav

Prakash Raj Viral Video: दिग्गज अभिनेते प्रकाश राज पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी पॅलेस्टाईनची तुलना काश्मीरशी केली आहे. एवढेच नाही तर त्यांनी आपल्या वक्तव्यात असे काही बोलले की, पुन्हा एकदा ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले. प्रकाश राज यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, राज यांची ही काही पहिली वेळ नाही, याआधीही आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते बरेच चर्चेत होते. पॅलेस्टाईनची काश्मीरशी तुलना करताना त्यांनी यावेळी कोणते वादग्रस्त वक्तव्य केले ते जाणून घेऊया...

दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल क्लिपमध्ये ते म्हणताना दिसत आहेत की, पॅलेस्टाईनमध्ये जे काही चालले आहे ते न्याय आहे का? आपल्याला न्याय हवा आहे. प्रकाश राज पुढे म्हणतात की, 'तुम्ही बाजू घेऊ शकत नाही कारण बाजू घेण्याचा कोणताही मुद्दा नाही. तुम्ही फक्त त्यांना त्यांची जमीन द्या.'

राज पुढे म्हणाले की, 'ते कसे जिवंत राहतात हा तुमचा मुद्दा नाही. आपल्यालाही काश्मीरच्या बाबतीत मोठा भाऊ व्हायला हवे होते, पण तसे झाले नाही.'' राज यांचे हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल करत आहेत.

दुसरीकडे, प्रकाश राज यापूर्वीही त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. कधी सनातन धर्माबाबत तर कधी चांद्रयानबाबत वादग्रस्त वक्तव्य करुन ते प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. याशिवाय, अनेकवेळा त्यांना सोशल मीडियावर वादग्रस्त ट्विटमुळेही मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. यावेळीही पॅलेस्टाईनची काश्मीरशी तुलना केल्याने त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 10 वर्षात त्यांना कॅन्सर होऊ शकतो पण, सरकारला फक्त वाहनांचा धोका मोठा वाटतोय; झुआरीनगरातील अमोनिया समस्येवरुन तरुण संतापला

World Cup 2025: 148 वर्षांत पहिल्यांदाच…! ICC ने उचलले महिलांच्या सन्मानाचे पाऊल, घेतला 'हा' मोठा निर्णय

Goa Crime: हैदराबादमधील युवकाला मैत्रीच्या बहाण्याने लुटले, पणजीतील हॉटेलात 5.7 लाखांचा गंडा; संशयितांना अटक

MRF Recruitment: कुडाळमध्ये नोकरभरतीची बातमी खोटी, गोव्यातील तरुणांसाठी 12 सप्टेंबरला फोंडा येथेच मुलाखती; एमआरएफ कंपनीचे स्पष्टीकरण

Recruitment Controversy: मनसे आयोजित नोकर भरतीवरुन गोव्यात राजकीय वादंग; फोंड्यात नोकरीसाठी कुडाळमध्ये मुलाखती का? आमदार सरदेसाईंचा भाजप सरकारला सवाल

SCROLL FOR NEXT