Akshay Kumar & Katrina Kaif & Ajay Devgan & Ranveer Singh Dainik Gomantak
मनोरंजन

सूर्यवंशीची बंपर ओपनिंग, पहिल्या दिवशीच केली कोट्यावधींची कमाई

अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफचा (Katrina Kaif) बहुप्रतिक्षित चित्रपट असलेला सूर्यवंशी अखेर शुक्रवारी प्रदर्शित झाला.

दैनिक गोमन्तक

अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफचा (Katrina Kaif) बहुप्रतिक्षित चित्रपट असलेला सूर्यवंशी (Sooryavanshi) अखेर शुक्रवारी प्रदर्शित झाला. रिलीज होताच, सूर्यवंशीने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली आहे. पहिल्या दिवसाच्या अंदाजानुसार, सूर्यवंशीने एकूण 26 कोटींचा गल्ला जमवला आहे. कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे जवळपास दोन वर्षांपासून हा चित्रपट रिलीजच्या प्रतीक्षेत होता. रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) चित्रपटाला अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याचा मोठा फायदा होत आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट चांगलाच आवडला असल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे अक्षय कुमारचा सूर्यवंशी हा चित्रपट देशभरात 4000 हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर हा चित्रपट जगभरात 5200 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. वृत्तानुसार, महाराष्ट्रासह हरियाणा आणि पंजाबसारख्या राज्यांमध्ये चित्रपटगृहांवर काही निर्बंध असल्याने चित्रपटाचे कलेक्शन कमी राहिले आहे. मात्र, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्याने चित्रपटाला अधिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. बॉक्स ऑफिसवर सूर्यवंशीची कामगिरी पाहता, असे म्हटले जात आहे की, सूर्यवंशी महामारीपूर्वीच्या परिस्थितीत फिल्म इंडस्ट्रीजला जवळपास चांगले दिवस आणण्यात यशस्वी ठरला आहे.

रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी या चित्रपटात अक्षय कुमार आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तसेच अजय देवगण (Ajay Devgan) आणि रणवीर सिंगही (Ranveer Singh) चित्रपटात कॅमिओ करताना दिसत आहेत. या सर्वांशिवाय गुलशन ग्रोव्हर, जॅकी श्रॉफ, जावेद जाफरी, कुमुद मिश्रा, निकेतन धीर, अभिमन्यू सिंग, राजेंद्र गुप्ता आणि सिकंदर खेर यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. अक्षय कुमारने सूर्यवंशीमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे, जो दहशतवाद्यांच्या एका गटाचा मुंबईवर हल्ला करण्याच्या योजना हाणून पाडण्याचा प्रयत्न करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT