Bollywood Actor Sonu Sood Dainik Gomantak
मनोरंजन

बहीण मालविकाने काँग्रेसमध्ये प्रवेश करताच सोनू सूदने घेतला मोठा निर्णय

पंजाबमध्ये नेत्यांच्या राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

पंजाबमध्ये नेत्यांच्या राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. पुढील महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत पंजाबमध्ये दररोज राजकीय समीकरणे बदलत आहेत. त्याचबरोबर बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) बहीण मालविका सूद सच्चरनेही राजकारणात पाऊल ठेवले आहे. अलीकडेच त्यांनी पंजाब (Punjab) काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला आहे. (Bollywood Latest News In Marathi)

तेव्हापासून मालविका सूद सच्चर या वेळी पंजाब विधानसभेची निवडणूक लढवतील अशी अटकळ बांधली जात आहे. त्यासाठीची तयारीही जोरात सुरू आहे. दुसरीकडे, भाऊ सोनू सूद बहीण मालविकासाठी प्रचार करणार की नाही, या अफवांचा बाजार बऱ्याच दिवसांपासून गरम होता, पण आता हा अभिनेता मालविकाच्या निवडणूक प्रचाराचा भाग असेल की नाही हे स्पष्ट झाले आहे.

सोनू सूद बहिणीसाठी प्रचार करणार नाही

सोनू सूदने नुकतेच एका इंग्रजी वेबसाइटशी संवाद साधला. यादरम्यान, त्याच्या आगामी चित्रपटांव्यतिरिक्त, त्यानी बहीण मालविका सूद सच्चरच्या राजकारणाबद्दल देखील विस्तृत चर्चा केली. सोनू सूदने आपल्या बहिणीसाठी प्रचार करणार नसल्याचे सांगितले. बहीण मालविका सूद सच्चरबद्दल बोलताना सोनू सूद म्हणाला, 'तिने हे पाऊल उचलले याचा मला अभिमान आहे. ती गेल्या काही वर्षांपासून तिथे राहत आहे आणि तिला लोकांच्या महत्त्वाच्या समस्या माहीत आहेत. मला आनंद आहे की ती लोकांशी संपर्क साधू शकेल आणि त्यांना थेट मदत करू शकेल.

काही दिवसांपूर्वी सोनू सूदने ट्विटरच्या माध्यमातून बहिण पंजाब विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'सर्व चांगल्या गोष्टींप्रमाणेच हा प्रवासही संपुष्टात आला आहे. राज्याचे आयकॉन पद मी स्वेच्छेने सोडले आहे. माझ्या कुटुंबातील सदस्याने पंजाब विधानसभेची निवडणूक लढवल्यामुळे मी आणि निवडणूक आयोगाने परस्पर संमतीने हा निर्णय घेतला आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी मी तिला शुभेच्छा देतो.

गेल्या आठवड्यात शनिवारी सोनू सूदची बहीण मालविका सच्चर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता, त्या वेळी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नीही तिथे होते. यासोबतच ते निवडणूक लढवणार असल्याचेही बोलले जात आहे. मुख्यमंत्री चन्नी यांनीही मालविका यांना मोगामधून काँग्रेसची उमेदवारी देण्याचे संकेत दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mopa Airport: गोव्यात Air India विमानाचा मोठा अनर्थ टळला! रन-वे सोडून केला टॅक्सी-वेवरून उड्डाणाचा प्रयत्न

Viral Video: थरारक...! जंगल सफारीचा रोमांचक अनुभव, चिडलेल्या गेंड्याचा गाडीवर हल्ला; थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल

Elvish Yadav: "अनेक घरे उद्ध्वस्त केली..." भाऊ गँगने एल्विश यादवच्या घरावर झाडल्या गोळ्या; पोस्ट करत दिली माहिती, हल्ल्याचे कारणही सांगितले

Goa Live News: सरकारी प्राथमिक शिक्षक सरकारी पतसंस्थेतर्फे निवृत्त शिक्षकांचा गौरव सोहळा

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

SCROLL FOR NEXT