Dahad Trailer Dainik Gomantak
मनोरंजन

Dahad Trailer : 27 मुलींची हत्या करणाऱ्या प्राध्यापकाची गोष्ट? सोनाक्षी सिन्हाच्या दहाडचं ट्रेलर रिलीज...

Rahul sadolikar

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता विजय वर्मा यांच्या मुख्य भूमीका असणाऱ्या 'दहाड' या वेब सीरिजचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर आज 3 मे रोजी रिलीज झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे सोनाक्षी सिन्हा या शोद्वारे ओटीटीमध्ये पाऊल ठेवणार आहे. या ट्रेलरमध्ये सोनाक्षी सिन्हा खाकी युनिफॉर्ममध्ये खूपच उठुन दिसत आहे.

 चित्रपटांनंतर, सोनाक्षी सिन्हाने आता ओटीटीच्या दुनियेत पाऊल ठेवले आहे आणि मुख्य़ अभिनेत्रीच्या भूमिकेत तीचा खूप दबदबा दिसत आहे. 'दहाड' या वेब शोचा ट्रेलर सस्पेन्सने भरलेला आहे, जो एक-दोन नव्हे तर 27 मुलींच्या मृत्यूच्या गुन्ह्याची ही कथा आहे.

या ट्रेलरमध्ये सोनाक्षी सिन्हा हरियाणातील एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे, जी व्यवसायाने आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाने दबदबा आहे. एकामागून एक बेपत्ता होणा-या अनेक मुलींची कहाणी त्याच्या समोर येत आहे आणि त्या सर्वांची कहाणी एकच आहे. 

आता सोनाक्षीने त्या बेपत्ता मुलींच्या रहस्यमयी हत्येचा शोध सुरू केला आणि ती या अंदाजापर्यंत आली आहे की या मुलींना पळवून नेणाऱ्या व्यक्तीनेच त्यांची हत्या देखील केली आहे.

शेवटी संशयाची सुई विजय वर्मा साकारत असलेल्या प्राध्यापकाच्या पात्रावर येते. सोनाक्षीला विजयनेच या सगळ्या हत्या केल्याची खात्री असताना, बाकीचे पोलीस विजय वर्मावर संशय घ्यायलादेखील तयार होत नाहीत.

आणि मग सुरू होते खऱ्या खुन्याचे सत्या समोर आणण्याची लढाई. 'दहाड' या मालिकेत एकूण आठ भाग आहेत. ही आगामी मालिका बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 मध्ये दाखवण्यात आली.

रीमा कागती आणि झोया अख्तर यांची ही मालिका रुचिका ओबेरॉयसह रीमा कागतीने दिग्दर्शित केली आहे. 'दहाड' या वेबसिरीजमध्ये सोनाक्षी सिन्हा, विजय वर्मा, गुलशन देवैया आणि सोहम शाह यांसारख्या तगड्या स्टारकास्टचा समावेश आहे. 'दहाड' 12 मे रोजी 240 हून अधिक देशांमध्ये प्राइम व्हिडिओवर रिलीज होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT