Smriti Irani
Janhvi Kapoor
Smriti Irani Janhvi Kapoor Dainik Kapoor
मनोरंजन

Smriti Irani Get Angry With Janhvi: "ही आजकालची मुलं"! जान्हवी कपूरवर का भडकल्या होत्या स्मृती इराणी ?

Rahul sadolikar

Smriti Irani Get Angry With Janhvi: अभिनेत्री जान्हवी कपूर ही अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांसमोर आली आहे. 'धडक' या सैराटच्या रिमेकनंतर ती चाहत्यांची लाडकी झाली आहे. नव्या पिढीची नायीका म्हणुन ती समोर आली आहे. अभिनयासोबतच सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर मोहिनी घालण्यात ती यशस्वी झाली आहे.

दोनच दिवसांपूर्वी तिचा वाढदिवस तिने साजरा केला आहे. तिने अभिनयाच्या क्षेत्रात येण्याला जान्हवीची आई दिवंगत श्रीदेवी यांचा विरोध होता. अभिनयासारख्या शाश्वती नसलेल्या क्षेत्रात तिने येऊ नये अशी श्रीदेवी यांचं मत होतं. जान्हवी सध्या पुन्हा एकदा चर्चत आली आहे त्याचं कारण म्हणजे स्मृती इराणी यांच्यासोबत जान्हवीचा घडलेला एक किस्सा.

स्मृती इराणला आज केंद्रीय मंत्री म्हणून ओळखल्या जातात, पण एक काळ असा होता जेव्हा त्या त्यांच्या 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या टेलिव्हिजन शोमुळे घराघरात नावाजल्या जायच्या. त्यांचा आणि जान्हवी कपूरचा हा भन्नाट किस्सा आहे.

यावेळी जान्हवी कपूरने स्मृती इराणी यांची माफी मागितली. जाणून घेऊया जान्हवीने असे काय केले की स्मृती इराणी संतापल्या.हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

स्मृती इराणी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबद्दल सांगितले होते. वास्तविक जान्हवी कपूर एका पार्टीत तिला वारंवार आंटी म्हणून हाक मारत होती आणि त्यानंतर तिने याबद्दल तिची माफी मागितली होती. 

हा व्हिडिओ 2018 च्या आसपासचा आहे. स्मृती इराणी यांनी लिहिले, 'माझा हा व्हिडीओ दुसऱ्याने शूट केला होता... जेव्हा जान्हवी कपूर मला आंटी म्हणत होती आणि नंतर प्रेमाने माफी मागत होती तेव्हा मी म्हणाले होते , काही हरकत नाही बेटा. ही आजची मुलं आहेत.

मात्र, या पोस्टवर लोकांनी विविध कमेंट्स केल्या असून काहींनी स्मृती इराणी यांना ट्रोलही केले आहे. तुम्हाला हे माहिती आहे का? स्मृती इराणी आणि जान्हवी कपूर यांच्या वयात २१ वर्षांचे अंतर आहे. 

एका यूजरने यावर - "काकू नाही, धाकटी बहीण म्हणायला हवं होतं" असं म्हटलं आहे. आणखी एका युजरने म्हटले आहे - "होय, ती एक आंटी आहे, हा विनोद नाही".

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

Goa Congress: भाजप सर्व आघाड्यांवर अपयशी, खलपांना लोकसभेत पाठवा; इंडिया आघाडी

Canacona: काणकोणवासीयांनी पल्लवींना पाठबळ द्यावे : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT