Sitara Dainik Gomantak
मनोरंजन

Sitara Ghattamaneni: सिताराने उचललं मोठं पाऊल; चाहते म्हणाले...

Sitara: इंस्टाग्रामवरही या व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

दैनिक गोमन्तक

Sitara: साऊथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबू आणि नम्रता शिरोड़करची मुलगी सितारा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी सितारा आपल्या कर्तृत्वाने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.

काही दिवसांपूर्वी सितारा टाइम्स स्क्वेअरवर झळकली होती. इतक्या लहान वयात जाहिरात मिळवणारी ती एकमेव स्टारकिड ठरली आहे. सिताराने 3 दिवस मोठ्या प्रमाणावर जाहिरातींचे चित्रीकरण केले आहे. सितारा घट्टमनेनी एका सुप्रसिद्ध ज्वेलरी ब्रँडचा चेहरा बनली आहे. पारंपारिक पोशाखात दागिने दाखवत असताना तिच्या चेहऱ्यावरील हास्य भूरळ पाडल्यावाचून राहणार नाही.

सिताराच्या या लूकचे आणि यशाचे कौतुक होत असतानाच आता तिने एक मोठे पाऊल उचलले आहे. तिने तिची पहिली सॅलरी एका चॅरिटीला दान केली आहे. तिच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. चाहते तिच्या कृतीनंतर तिच्यावर फिदा झाले आहेत. एकच हृदय आहे किती वेळा जिंकशील असे चाहते म्हणताना दिसत आहेत. मिळालेल्या माहीतीनुसार, सिताराला तिच्या या पहिल्या अॅडसाठी एक कोटी रुपए मिळाले आहेत.

दरम्यान, नम्रता शिरोडकर आणि महेश बाबूने आपल्या लेकीच्या यशाचे कौतुक केले आहे. स्वप्नपूर्तीचा आनंद काय असू शकतो हे आम्हाला माहीत आहे, अशीच चमकत राहा असे नम्रताने सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली आहे. सिताराने आत्तापर्यत दिलेल्या मुलाखतीत आपल्या यशात आपल्या आईचा वाटा असल्याचे म्हटले आहे तर टाइम स्क्वेअरचा व्हिडिओ पाहताना भावूक झाल्याचे म्हटले आहे. इंस्टाग्रामवर सिताराचे 1.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

सिताराला डान्स आणि अॅक्टींग आवडते आणि अनेकदा सारंगा धारिया, नगाडा ढोल यासारख्या गाण्यांवरचा डान्स स्टेपही तिने शेअर केल्या आहेत. इंस्टाग्रामवरही या व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT