Dainik Gomantak 

मनोरंजन

श्रद्धा नाईकचा यशस्वी नृत्य प्रशिक्षक ते यशस्वी युट्यूबरपर्यंतचा प्रवास

आपल्या मनासारखे काम आपल्याला मिळत नाही म्हणून तिने लहान मुलांसाठी नृत्याचे वर्ग उघडले.

दैनिक गोमन्तक

श्रद्धा नाईक हिला ती ‘झुम्बा’ (Zumba) या नृत्य प्रकाराशी किंवा युट्यूबशी जोडली जाणार आहे, हे अवघ्या काही वर्षांपूर्वी ठाऊकसुद्धा नव्हते. बारावीनंतर तिने रेडियो जॉकी डिप्लोमा कोर्स केला व त्यानंतर तिने एका स्थानिक टीव्ही चॅनेलसाठी पत्रकार (Journalist) म्हणून कामही केले. अर्थात नृत्याची आवड तिला पूर्वीपासून होतीच. आपल्या मनासारखे काम आपल्याला मिळत नाही म्हणून तिने लहान मुलांसाठी नृत्याचे वर्ग उघडले. वर्गात येण्यासाठी काही महिलानीही उत्सुकता दाखवली. मग या नृत्य वर्गात त्यांचाही समावेश झाला. हिपॉप, कंटेम्पररी वगैरे शैलीचे नृत्य ती त्यांना शिकवत होती. या दरम्यान तिला ‘झुम्बा’ या नवीनच सुरू झालेल्या नृत्य प्रकाराविषयी कळले. साल होते 2015!

त्याच दरम्यान ‘झुम्बा’ स्पेशलिस्ट सुचिता पॉल या गोव्यात (Goa) आल्या होत्या. त्यांनी गोव्यात झुंबाची कार्यशाळा आयोजित केली होती. या त्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत भारतभरचे प्रशिक्षणार्थी आले होते. श्रद्धाने या कार्यशाळेत भाग घ्यायचे ठरवले. खरंतर श्रद्धाच्या या निर्णयाला तिच्या घरच्यांचा अजिबात पाठिंबा नव्हता परंतु श्रद्धाने निश्चयाने ‘झुम्बा’ प्रशिक्षक म्हणून लायसन्स मिळवले. त्यानंतर तिने गोव्यात झालेल्या या कार्यशाळेत भाग घेतला व ती ‘झुम्बा’ प्रशिक्षक बनायला सिद्ध झाली.

पर्वरी (Porvorim) इथल्या ‘संत गाडगे महाराज सभागृहा’त श्रद्धाने आपले ‘झुम्बा’ नृत्य वर्ग सुरू केले. त्याचदरम्यान पर्वरीत ‘नोमोझो’ (नो मोटर झोन) हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडून श्रद्धाने आपल्या आयोजन व नेतृत्वगुणांची झलक दाखवली. या उपक्रमातून श्रद्धाची ओळख अनेकांना झाली. तिचा आत्मविश्वास वाढला. ती वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घेऊ लागली. वेगवेगळे उपक्रम आखू लागली. दरम्यान तिचे झुम्बा वर्ग सुरू होतेच.

झुम्बाचे देखील वेगवेगळे प्रकार असतात. त्या प्रकारांचे प्रशिक्षक बनायचे असेल तर ते शिकून, त्याचे वेगळे लायसन्स मिळवावे लागते. श्रद्धाने ‘अ‍ॅक्वा झुंबा’चे लायसन्स मिळवले. या प्रकारात झुम्बाचे प्रशिक्षणार्थी पाण्यात उतरून फिटनेसचाठीचा (Fitness) हा नृत्य प्रकार करतात.साऱ्या ‘झुंबा’ प्रकारात पश्चिमात्य संगीत वापरले जाते. परंतु गोव्यातल्या अनेकांना हिंदी (किंवा बॉलिवूड) संगीत (Music) हवे असते. भारतीय संगीत वापरणारा ‘पॉवर गरबा’ हा देखील झुम्बाचा एक वेगळा प्रकार आहे, ज्यात गरबा शैलीचे संगीत वापरले जाते. श्रद्धाने ‘पॉवर गरबा’चे लायसन्सदेखील मुंबईला (Mumbai) जाऊन मिळवले. त्यांची वेगळी गाणी असतात व ती वापरण्यासाठी वेगळे शुल्क भरावे लागते. अशा वेगवेगळ्या रॉयल्टीपोटी श्रद्धा आज महिन्याला सुमारे साडेतीन हजार रुपये खर्च करते.

बराच काळ ती गोव्यात एकटीच “पॉवर गरबा’ मान्य झुम्बा प्रशिक्षक होती. मात्र त्यानंतर तिनेच प्रयत्न करून गोव्यात या झुम्बाचे वेगळे प्रशिक्षण आयोजित केले. मुंबईहून ‘पॉवर गरबा’चे विशेषज्ञ आले आणि त्यांच्या या प्रशिक्षण कार्यशाळेत गोव्यातल्या 16 जणांनी ‘पॉवर गरबा’चे लायसन्स मिळवले. श्रद्धाने उचललेल्या या पावलामुळे आज गोव्यात 41 ‘पॉवर गरबा’ प्रशिक्षक आहेत. त्यातले काही प्रशिक्षक नोकरी करतात तर काहीजण विद्यार्थीही आहेत. पण झुम्बा प्रशिक्षण देऊन ते आपली वेगळी कमाई करतात. श्रद्धा म्हणते, त्यांनी निवडलेल्या या वेगळ्या मार्गाला आपण कारणीभूत ठरले त्याचा आपल्याला आनंद वाटतो.

कोविडकाळात (Corona) जेव्हा सारे बंद होते, तेव्हा श्रद्धाने गंभीरपणे लिहायला सुरुवात केली. गरबा गुजरातीतच का असावा, असा विचार करुन तिने नवरात्रीचे नमन कोकणीतून लिहिले व त्यात घुमटावादनाचा वापर केला. त्यासाठी निर्माण केलेल्या व्हिडिओचे दिग्दर्शन तिने स्वतःच केले. हा व्हिडिओ तिने स्वतःचा युट्युब (Youtube) बनवून त्यावर टाकला. यूट्यूब चॅनलचे नाव होते, ‘आरंभ: युथ ऑफ गोवा’. आज या चॅनलचे सहा हजारांवर सबस्क्रायबर आहेत. ‘बाळा राया मापारी’ या गोवा मुक्तीसाठी लढलेल्या पहिल्या हुतात्म्यावर तसेच ‘कटमगाळ दादा’ या दैवी पुरुषावर तिने तयार केलेल्या व्हिडिओना लाखावर दर्शक लाभले आहेत. अशाप्रकारे श्रद्धा यशस्वी युट्युबर देखील बनली. हल्ली श्रद्धाने फोंडा (Ponda) शहरात ‘आरंभ कलाघर’ नावाचे संगीत, नृत्य व फिटनेस यांचा समावेश असलेला वर्ग सुरू केला आहे. तिथून ती आपल्या सार्‍या उपक्रमांना चालवते व भावी उपक्रमांना आकारही देते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT