Salman Khan Viral Video Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan Viral Video : सलमानशी शेकहँड करणाऱ्या फॅनला शेराने दिला धक्का..व्हिडीओ व्हायरल

सलमान खानचा बॉडिगार्ड शेराने एका चाहत्याला धक्का दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे

Rahul sadolikar

Salman Khan Viral Video : या महिन्यात ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भाईजान या चित्रपटामुळे सतत चर्चेत असतो. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अपेक्षेइतकी कमाई करू शकला नाही.

दरम्यान, मुंबई विमानतळावरील सलमान खानचा एक व्हिडिओ चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये सलमानचा रागात असल्याचं दिसत आहे . केवळ सलमानच नाही तर त्याचा बॉडीगार्ड शेराही खूप संतापलेला दिसत आहे.

सलमान खान नुकताच मुंबई विमानतळावर दिसला. यादरम्यान त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, मात्र एका व्हिडिओमध्ये त्याचा राग पाहून चाहतेही घाबरले. वास्तविक बुधवारी संध्याकाळी सलमान दुबईहून परतला. 

सलमान दिसताच त्याला पाहण्यासाठी मुंबई विमानतळावर चाहत्यांची गर्दी झाली होती. त्याची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण आतुर झाले होते.

विमानतळावरील गर्दी इतकी अनियंत्रित दिसत होती की सलमानचा बॉडीगार्ड शेरालाही स्वत:वर नियंत्रण ठेवणे कठीण जात होते. दरम्यान, एका चाहत्याने सलमानशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला. 

यावर सलमानने त्याच्याकडे रागाने पाहिले आणि शेराकडे बोट दाखवत त्याला निघून जाण्यास सांगितले. यानंतर शेराने त्या व्यक्तीला ढकलून दिले. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सलमान खानचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'भाई लॉरेन्सला घाबरतो, त्यामुळेच त्याचं चाहत्यांशी पटत नाही.

' एकाने लिहिले, 'दाखवला ना ठेंगा. काय राहिलं माहीत नाही. हस्तांदोलन करणार सर. हस्तांदोलन?' एकाने लिहिले त्यामुळे प्रत्येकजण त्याचा तिरस्कार करतो. एकाने लिहिले आहे, चित्रपट फ्लॉप झाल्याचा राग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: बाईक फुल स्पीडमध्ये, दोन्ही हात सोडले...तरुणीचा जीवघेणा स्टंट व्हायरल! पोलीस घेतायत शोध

Goa Crime: सांकवाळ येथे फ्लॅट फोडून साडेआठ लाखांचा ऐवज लंपास, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Asia Cup Trophy Controversy: "आशिया कप ट्रॉफी दिली नाहीतर..." BCCI ॲक्शन मोडमध्ये! मोहसिन नक्वीला दिली 'वॉर्निंग'

Goa Weather Update: ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर पावसाचं संकट; 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT