Vivek Agnihotri Viral Tweet
Vivek Agnihotri Viral Tweet Dainik Gomantak

Vivek Agnihotri Viral Tweet : 7 नॉमिनेशन्स मिळुनही विवेक अग्नीहोत्रींनी फिल्मफेअरला बॉयकॉट का केलं? ट्विट होतंय व्हायरल...

दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी 'फिल्मफेअर' पुरस्काराला बॉयकॉट केलं आहे.
Published on

Vivek Agnihotri Viral Tweet: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सोशल मिडीयावर सतत चर्चेत असतात. आपली मतं बेधडकपणे मांडताना ते कुणाचीही भीडभाड बाळगत नाहीत. आता पुन्हा एकदा फिल्मफेअरच्या निमीत्ताने ते चर्चेत आले.

7 श्रेणीमध्ये नामांकन असूनही विवेक अग्निहोत्रीने फिल्मफेअर पुरस्कारांना नकार दिला. आता फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या घोषणेच्या काही तास आधी त्यांनी या शोवर बहिष्कार टाकला आहे. 

27 एप्रिलच्या रात्री फिल्मफेअर अवॉर्ड्सची घोषणा होणार आहे, ज्याच्या काही तास आधी विवेकने फिल्मफेअरबद्दल एक लांबलचक ट्विट शेअर केले आहे. त्यामुळे दिग्दर्शक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

विवेक अग्निहोत्रीच्या द काश्मीर फाइल्स या चित्रपटाला फिल्मफेअर २०२३ मध्ये सात श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. विवेकला हे समजताच, त्याने नम्रपणे या अवॉर्ड शोचा भाग होण्यास नकार दिला आणि त्यामागील कारण स्पष्ट करणारी एक लांबलचक नोट लिहिली, ज्यामध्ये त्याने अवॉर्ड शो वर टीकाही केली आहे.

विवेक अग्निहोत्रीने लिहिले, "मला मीडियाच्या माध्यमातुन कळले की काश्मीर फाइल्सला 68 व्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी सात श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे, परंतु मी या अनैतिक आणि सिनेमाविरोधी पुरस्कार शोचा भाग होण्यास शांतपणे नकार दिला. येथे मी सांगू इच्छितो.

फिल्मफेअरच्या मते, स्टार्सशिवाय कोणाचाही चेहरा नाही. कोणी आहे की नाही हे महत्त्वाचे नाही. म्हणूनच संजय भन्साळी किंवा सूरज बडजात्या यांसारख्या मास्टर डायरेक्टरना फिल्मफेअरच्या गूढ आणि अनैतिक जगात चेहरा नाही. संजय भन्साळी आलिया भट्टसारखा, सूरज मिस्टर बच्चनसारखा आणि अनीस बज्मी कार्तिक आर्यनसारखा दिसतोय.

फिल्मफेअर अवॉर्ड्समधून चित्रपट निर्मात्याची प्रतिष्ठा येते असे नाही, पण ही अपमानास्पद व्यवस्था संपली पाहिजे. म्हणूनच, बॉलीवूडच्या भ्रष्ट, अनैतिक आणि गुंडगिरीच्या स्थापनेविरुद्ध माझा निषेध आहे, जो मी असे पुरस्कार नाकारून व्यक्त करत आहे."

त्यांनी पुढे लिहिले, "मी कोणत्याही जाचक आणि भ्रष्ट व्यवस्थेचा किंवा पुरस्कार कार्यक्रमाचा भाग होण्यास नकार देतो जे लेखक, दिग्दर्शक आणि इतर एचओडी आणि चित्रपटाच्या क्रू सदस्यांना नोकर किंवा स्टार्सच्या खाली मानतात. जिंकलेल्या सर्वांना माझे अभिनंदन आणि बरेच काही."

Vivek Agnihotri Viral Tweet
Malika Arora Viral Video : चाहत्यांच्या गर्दीत गुदमरली छैय्या छैय्या गर्ल...मलायका अरोराचा हा व्हायरल व्हिडीओ पाहिलात का?

दुष्यंत कुमारच्या काही ओळी उद्धृत करून, विवेक अग्नीहोत्रींनी आपले मत मांडले आहे, "चांगली गोष्ट म्हणजे मी एकटा नाही. हळूहळू पण निश्चितपणे, एक समांतर चित्रपट उद्योग उदयास येत आहे. तोपर्यंत....

सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,

मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com