Sheezan Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Sheezan Khan: तुनिषा आत्महत्येबद्दल अखेर शिझान बोलला! 'त्यानंतर मी 70 दिवस...'

Sheezan Khan: तुनिषा माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग होती. तिच्या जाण्याने माझ्या आयुष्यात कायमची एक पोकळी निर्माण झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Sheezan Khan: खतरों के खिलाडी हा टीव्ही शो प्रेक्षकांच्या आवडत्या कार्यक्रमापैकी एक आहे. आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिझान खान पून्हा एकदा चर्चेत आला आहे. सहकलाकार आणि चांगली मैत्रीण तुनिषा शर्मा हिने आत्महत्या केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.

आता एका मुलाखतीदरम्यान, शिझान खानने तुनिषाच्या मृत्यूनंतर त्याला कशाचा सामना करावा लागला हे सांगितले आहे. तो म्हणतो, तुनिषा माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग होती. तिच्या जाण्याने माझ्या आयुष्यात कायमची एक पोकळी निर्माण झाली आहे. ती जर आता इथे असती तर माझा आधार बनली असती.

तुनिषा माझ्यासाठी नेहमीच टुन्नु या घटनेनंतर मी ज्यांना जवळचे मानत होतो त्यांनी कोणतीही शहानिशा न करता माझ्याशी बोलणे बंद केले. माझ्या कुटुंबाला त्यांची कोणतीही चूक नसताना वाईट वागणूक दिली गेली. त्यांच्यावर चूकीचे आरोप केले गेले. ते माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक होते.

मी जामीनावर सुटुन माझ्या घरी परतलो तेव्हा मला माझेच घर अनोळखी वाटत होते. त्यानंतर ७० दिवस मी स्वस्थपणे झोपू शकलो नाही. या सगळ्याचा सामना करण्यासाठी मला वैद्यकीय उपचारांचा आधार घ्यावा लागला असे म्हणत शीझान खानने आपल्या भावना व्यक्त केला आहे. मात्र आपले कुटुंब, वकील आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचेही शीझान खानने म्हटले आहे.

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा 24 डिसेंबर 2022 रोजी पालघर जिल्ह्यातील वसई येथे एका मालिकेच्या सेटवर मृतावस्थेत आढळून आली होती. दरम्यान, तुनिषाची आई वनिता शर्मा यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शीजानविरुद्ध एफआयआर नोंदवून त्याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, दोघे रिलेशनशिपमध्ये होते आणि तुनिषाच्या आत्महत्येच्या १५ दिवस आधी हे नाते तुटले. ब्रेकअपमुळे ती नाराज असल्याचे म्हटले जात होते. दरम्यान, खतरों के खिलाडी हा शो मधून शीझान खान पून्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT