Jawan Box Office Collection Day 17 : "बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर", "अपनी माँ से किया गया वादा हू" यांसारख्या संवादांनी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या किंग खान अर्थात बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानने आपल्या जवान चित्रपटाची क्रेझ 17 व्या दिवशीही कायम ठेवण्यात यश मिळवले आहे.
7 सप्टेंबर ला झालेल्या जबरदस्त ओपनिंगपासून 17 व्या दिवसांपर्यंत जवानने केलेली कमाई थक्क करणारी आहे.
आपल्या जबरदस्त फॅन फॉलोईंगच्या आणि ॲटलीच्या भन्नाट दिग्दर्शनाच्या जोरावर शाहरुख खानने आपला दबदबा कायम ठेवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 'जवान'(Shahrukh Khan's Jawan ) ने 17व्या दिवशी भारतात सर्व भाषांमध्ये 13 कोटी नेट कलेक्शन केले. चित्रपटाचे पहिल्या आठवड्याचे कलेक्शन 389.88 कोटी आहे
पहिल्या आठवड्यात हिंदी भाषेत 347.98 कोटी; तमिळमध्ये 23.86 कोटी, तेलुगु, 18.04 कोटी अशी कमाई केली.
दुसर्या आठवड्याचे कलेक्शन 136.1 कोटी हिंदीमध्ये 125.46 कोटी; तमिळ- 41 कोटी आहे कोटी, तेलुगु- 6.47 कोटी अशी तुफानी कमाई केली. तिसर्या शुक्रवारी, जवानने 7.6 कोटी (हिंदी: ₹ 7.1 कोटी; तमिळ- 15 लाख, तेलुगु- 35 लाख अशी कमाई केली.
546.58 या जोरदार कमाईसह शाहरुख खानचा जवान आतापर्यंतचा हा चौथा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. शुक्रवारपर्यंत, जवानने जगभरात ₹ 953.97 कोटींची कमाई केली आहे .
ॲटली दिग्दर्शित, जवान या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती प्रमुख भूमिकेत आहेत.
जवानमध्ये प्रियामणी, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा, लहर खान, गिरीजा ओक आणि संजीता भट्टाचार्य यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटात संजय दत्त आणि दीपिका पदुकोण यांनी छोट्या भूमिका केल्या होत्या.
अलीकडेच X वर (पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जाणारे) आस्क मी एनीथिंग सेशनवेळी, एका चाहत्याने त्याला विचारले, “दीपिकासोबत 7व्यांदा सेटवर कसा अनुभव होता?” त्याने उत्तर दिले, "तिच्यासोबत काम करताना नेहमीच आनंद मिळतो."
नुकत्याच शाहरुख खानने मुंबईत एका पत्रकार परिषदेत या चित्रपटाविषयी सांगितले. तो म्हणाला, “हा एक उत्सव आहे. वर्षानुवर्षे चित्रपटासोबत जगण्याची संधी क्वचितच मिळते. कोविड आणि वेळेच्या कमतरतेमुळे जवान बनवण्याचे काम चार वर्षांपासून सुरू आहे.
या चित्रपटात बरेच लोक सामील होते, विशेषत: दक्षिणेतील लोक जे मुंबईत येऊन स्थायिक झाले आहेत आणि गेल्या चार वर्षांपासून मुंबईत राहत आहेत आणि या चित्रपटासाठी रात्रंदिवस काम करत आहेत, जे आतापर्यंतचे सर्वात कठीण काम आहे.”