Raghav - Parineeti Wedding : उदयपूरचा पॅलेस सजुन तयार...परिणिती- राघवच्या लग्नाची लगबग सुरू
Raghav Chaddha - Parineeti Chopra Wedding in Udaipur : अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांच्या विवाहबंधनाला आता काही तास उरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या लग्नाच्या तारखेबद्दल जोरदार चर्चा होत्या.
आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असुन राघव-परिणिती राजस्थानच्या उदयपूर पॅलेसमध्ये एकमेकांना हात आयुष्यभर पकडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
परिणीती आणि राघव राज्यातील लीला पॅलेस हॉटेलमध्ये लग्नाचे सात फेरे घेणार आहेत. अशा परिस्थितीत या दोघांच्या लग्नासाठी उदयपूरचा लीला पॅलेस उजळून निघाला आहे.
पॅलेसच्या आतील फोटो
या जोडप्याच्या ग्रँड वेडिंग सेलिब्रेशनची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान, उदयपूरच्या लीला पॅलेसची काही आतील फोटो समोर आले आहेत, जी लग्नासाठी कशी सजावट केली जात आहे हे सांगण्यासाठी पुरेसे आहेत.
परिणिती -राघवच्या लग्नाची लगबग
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नासाठी राजस्थानच्या उदयपूरमध्ये पाहुण्यांचे आगमन सुरूच आहे असे काही पाहुणे आहेत जे लग्नाच्या एक-दोन दिवस आधी उदयपूरला पोहोचले आहेत, त्यांच्यामध्ये हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्रीच्या नावाचाही समावेश आहे.
फोटो झाले व्हायरल
दरम्यान, भाग्यश्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर उदयपूरच्या लीला पॅलेसचे काही लेटेस्ट व्हिडिओ शेअर केले आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नासाठी लीला पॅलेसला सुंदर सजावट करण्यात आली आहे, याचा अंदाज हे व्हिडिओ पाहून सहज लावता येईल.
तसेच, लग्नाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी कशी सुरू आहे? दुसरीकडे, फॅशन डिझायनर पवन सचदेवानेही इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून चाहत्यांना परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या ठिकाणाची ओळख करून दिली आहे..
प्रियांकाने शेअर केला फोटो
प्रियांका चोप्रा तिची चुलत बहीण परिणीती चोप्राच्या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाही . शनिवारी प्रियांकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर परीचा एक फोटो शेअर केला आणि खुलासा केला की काही कारणास्तव ती तिच्या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाही.

