Shahrukh Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Shahrukh Khan : "जॅकेट थोडं स्वस्तातलं बनवा,आम्हीपण विकत घेऊ"...आर्यनच्या महागड्या जॅकेटवर प्रश्न विचारताच शाहरुख म्हणाला...

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या महागड्या जॅकेटवर शाहरुखने चाहत्याला उत्तर दिलं आहे.

Rahul sadolikar

अभिनेता शाहरुख खान सध्या जवान या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. सोशल मिडीयावर शाहरुखच्या आस्क मी एनीथिंग या सेगमेंटला त्याच्या चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतोय. शाहरुख या सेगमेंटच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असतो.

आता पुन्हा एकदा शाहरुखने हा सेगमेंट सुरू केला असुन यावेळी एका युजरच्या प्रश्नावर शाहरुखने उत्तर दिल्यामुळे शाहरुखची चर्चा होत आहे.

नुकतंच शाहरुखने जगभरातील त्याच्या चाहत्यांसाठी आस्क मी एनीथिंग सत्र आयोजित केले होते, ज्यामध्ये लोकांनी त्याला विविध प्रश्न विचारले. बहुतेक लोकांनी त्याला त्याच्या आगामी 'जवान' चित्रपटाबद्दल प्रश्न विचारले असले तरी एका ट्विटर यूजरने त्याला त्याचा मुलगा आर्यन खानच्या ब्रँडच्या कपड्यांबद्दल प्रश्न विचारला. 

या यूजरने शाहरुखला त्याची किंमत थोडी परवडणारी बनवण्यास सांगितले जेणेकरुन त्याच्यासारखे लोक देखील ते खरेदी करू शकतील. साहजिकच शाहरुखने त्याच्या नेहमीच्या मिश्किल स्वरात चाहत्याच्या या प्रश्नाचे उत्तर दिले.

शाहरुखचा मुलगा आर्यन खानने त्याचा कपड्यांचा ब्रँड Dyavol X लॉन्च केला आहे, या ब्रँडचे जॅकेट 2 लाख रुपये किंमतीचे आहे आणि टी-शर्टची सुरुवातीची किंमत सुमारे 24 हजारांपासून सुरू होते. 

लॉन्च झाल्यानंतर, ही साइट तिच्या गगनाला भिडलेल्या किमतीमुळे खूप चर्चेत आली. यामुळे लोकांनी आर्यन खानला खूप ट्रोल केले. शेवटी #AskSRK सत्रादरम्यान या ब्रँडच्या प्रचंड किंमतीवर शाहरुख खान प्रथमच बोलला.

खरं तर, #AskSRK सत्रादरम्यान, एका युजरने शाहरुखला आर्यनच्या कपड्यांच्या ब्रँडची किंमत परवडणारी ठेवण्यास सांगितले. या यूजरने लिहिले की, 'डायव्होल एक्सचे जॅकेट थोडे 1000-2000 चे बनवा, तो ते घेण्यासाठी घरी जाईल.

' यावर शाहरुखने लगेचच उत्तर दिले. मात्र, या प्रश्नावर त्यांनी सामान्यतः दुकानदार जे उत्तर देतात तेच उत्तर लोक जेव्हा त्यांना किंमत कमी करण्यास सांगतात. शाहरुख खान म्हणाला, 'D'Yavol X चे हे लोक मलाही स्वस्तात विकत नाहीत, याबद्दल मी काहीतरी करतो. #जवान.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT