गेल्या काही दिवसांपासून 'द केरला स्टोरी' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या बंदी आणण्यासाठी अगदी सुप्रिम कोर्ट गाठण्यात आलं होतं. चित्रपटात केला गेलेला दावा खरा आहे हे सिद्ध करा आणि 1 कोटी मिळवा असंही आव्हान काँंग्रेस नेते शशी थरूर यांनी दिलं होतं अखेर 5 मे रोजी हा चित्रपट रिलीज झाला आणि पहिल्या दिवशी चित्रपटाने चांगली कमाई केली.
सध्या हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे कारण या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री अदा शर्माने या चित्रपटाला प्रोपोगांडा फिल्म म्हणणाऱ्या लोकांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.
चित्रपट निर्माते सुदिप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाला काही प्रेक्षक प्रोपगंडा फिल्म म्हणत आहेत. केरळमधील 32,000 हिंदू आणि ख्रिश्चन महिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि नंतर त्यांना सीरियात नेऊन ISIS मध्ये भरती करण्यात आल्याचा दावा या चित्रपटात करण्यात आला आहे.
या प्रकरणाने वादाचे स्वरूप धारण केले असून त्याला अपप्रचार म्हटले जात आहे. असे म्हणणाऱ्यांना पुन्हा एकदा 'द केरळ स्टोरी'ची मुख्य अभिनेत्री अदा शर्माने प्रत्युत्तर दिले आहे
अदा शर्माने ट्विटरवर एक पोस्ट टाकून चित्रपटाला अपप्रचार म्हणणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'आणि काही लोक अजूनही द केरळ स्टोरी या चित्रपटाला प्रोपगंडा चित्रपट म्हणत आहेत. अनेक भारतीय चित्रपटांची प्रशस्तीपत्रके पाहून असे प्रसंग अजिबात घडलेच नाहीत असे सांगत आहेत.
अदाने अशा लोकांना विशेष विनंती केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, 'माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की गुगलवर ISIS आणि Brides हे दोन शब्द टाईप करा, कदाचित गोर्या मुलींचे अकाऊंट असेल, जे तुम्हाला सांगू शकतील की आमच्या भारतीय चित्रपटाची कथा खरी आहे.' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.