Shahrukh Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Shahrukh Khan: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या घरी गणेश दर्शनासाठी पोहोचला शाहरुख...वर्षा बंगल्यावर स्टार्सची लगबग

Shahrukh Khan: शाहरुख खानने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गणेश दर्शनासाठी पोहोचला होता.

Rahul sadolikar

Shahrukh Khan at Maharashtra CM Eknath Shinde's House: अभिनेता शाहरुख खान सध्या जवान चित्रपटाच्या जबरदस्त यशामुळे प्रचंड चर्चेत आहे.

जवानने देशभरात 550 कोटींची तुफानी कमाई केली आहे, तर जगभरातली जवानची कमाई 1 हजार कोटींच्या घरात आहे.

जवान रिलीज होऊन सुपरहिट झाला. सध्या शाहरुख गणेशोत्सवात व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुखने उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी गणेश आरतीसाठी हजेरी लावली होती.

आता शाहरुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंंदेंच्या वर्षा निवासस्थानी गणेशदर्शनाला गेला होता.

मुख्यमंत्र्यांच्या घरी कलाकार

गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र सुरू असताना बॉलीवूडचे अनेक दिग्गज कलाकार गणपती दर्शनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहोचले.

 शाहरुख खानचे आगमन होताच एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत केले. शाहरुख खानचं आगमन होताच मुख्यमंत्र्यांसहित सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

Shahrukh Khan at Maharashtra CM Eknath Shinde's House

शाहरुखला सीएम शिंदेंनी मिठी मारली

देशभरात गणेश चतुर्थी साजरी केली जाते. ठिकठिकाणी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मंडप उभारण्यात आले आहेत. सेलेब्सनेही मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाला घरी बोलावले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या निवासस्थानी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली.

बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स त्यांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले. शाहरुख खान मॅनेजरसोबत पोहोचला होता, त्याचे एकनाथ शिंदे यांनी जोरदार स्वागत केले आणि मिठी मारली. 'अनुपमा'ची रुपाली गांगुलीही दिसली.

Shahrukh Khan - Eknath Shinde

सेलिब्रिटींचे फोटो आले समोर

एकनाथ शिंदे यांच्या घरातून गणपती दर्शनासाठी आलेल्या अनेक सेलिब्रिटींचे फोटो आले आहेत, ज्यात अनेक सेलिब्रिटी दिसत आहेत. 'बिग बॉस ओटीटी 2'चा विजेता एल्विश यादवही दिसला.

शाहरुख खानला पाहताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला मिठी मारून त्याचे स्वागत केले.एकनाथ शिंदे यांनी शाहरुखचे पुष्पगुच्छ देऊन शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.

Asha Bhosle at Maharashtra CM Eknath Shinde's House

गायिका आशा भोसलेही उपस्थित

मुख्यंत्री शिंदेंच्या निवासस्थानी गायिका आशा भोसलेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहोचल्या. एकनाथ शिंदे यांनी त्यांना गणपती बाप्पाची मूर्ती भेट केली.

गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अभिनेत्री श्रेया सरन पतीसोबत एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहोचली होती. असे त्यांचे स्वागत करण्यात आले.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT