Viacom18 स्टुडिओजचा 'शाबाश मिठू' 15 जुलै 2022 रोजी रुपेरी पडद्यावर येणार आहे. 'शाबाश मिठू'च्या रिलीज डेटची घोषणा करताना, बॉलिवूड स्टार तापसी पन्नूने तिच्या सोशल अकाउंटवरून आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे. यासोबतच तिने चित्रपटाचे एक नवीन पोस्टर (Poster) देखील शेअर केले आहे, ज्यामध्ये ती क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसत आहे.
'शाबाश मिठू' (Shabaash Mithu) हा चित्रपट भारताच्या महिला वनडे क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिच्या जीवनावर आधारित आहे. मिताली राजच्या आयुष्यातील चढ-उतार, यश-अपयशाचे वर्णन या चित्रपटात करण्यात आले आहे. या चित्रपटात (Movie) तापसीशिवाय विजय राज देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या स्पोर्ट्स ड्रामा (Sport Drama) चित्रपटाचे दिग्दर्शन सृजित मुखर्जी यांनी केले असून चित्रपटाची कथा प्रिया अवेनने लिहिली आहे.
चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेची घोषणा करताना, तापसी पन्नूने (Taapsee Pannu) तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले- "त्या मुलीपेक्षा जास्त शक्तीशाली कोणीच असू शकत नाही जिच्याकडे स्वत:ला सिद्ध करण्याचे जगाला काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे. ती जिद्द ते स्वप्न पुर्ण करण्याचे तिच्याकडे प्लॅनिंग आहे. ही कथा अशाच एका मुलीची जिने 'जंटलमन्स गेम' मध्ये प्रवेश केला आणि बॅट उचलून तिच्या स्वप्नाचा पाठलाग केला. शाबाश मिठू: द अनहर्ड स्टोरी ऑफ वुमन इन ब्लू ची न ऐकलेली कथा 15 जुलै 2022 रोजी थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे."
तापसी पन्नू स्टारर फिल्म 'शाबाश मिट्ठू' या चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले आहे. या पोस्टरमध्ये तापसी हातात बॅट घेऊन पीचवर उभी दिसत आहे. दरम्यान मैदानावर धुआंदार प्रदर्शन दाखवत आहेत. तापसीने दिलेली पोज खूप आकर्षक दिसत आहे. तापसी पन्नूने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे पोस्टर शेअर केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.