महाराष्ट्रात (Maharashtra) मागील काही दिवसांपासून आर्यन खान प्रकरण (Aryan Khan case) अधिकच जोर धरत असताना आर्यनच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पुन्हा एकदा वाढ होणार का? त्याला न्यायालयकडून दिलासा मिळणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहीलं आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनवाणी पार पडली. आर्यनच्या वतीने प्रसिध्द वकिल अमित देसाई युक्तिवाद केला. मात्र न्यायालयाने आर्यनच्या न्यायालयीन कोठडीमध्ये अखेर वाढ केली आहे.
मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या आर्यनचा जामीन अर्ज गेल्या अनेक दिवसांपासून पुढील तारखेपर्यंत पुढे ढकलला जात होता. 14 ऑक्टोबर रोजी सत्र न्यायालयात वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती व्ही व्ही पाटील यांनी जामीन अर्जावरील आपला निर्णय राखून ठेवला होता. यानंतर, न्यायालयाने दसऱ्याच्या सुटीनंतर 20 ऑक्टोबर रोजी जामीन अर्जावर निकाल देण्याचे सांगितले होते. आज यावर निर्णय आला आणि आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.
आर्यन खानचा जामीन फेटाळला, त्याला आणखी रात्री तुरुंगात काढाव्या लागतील
आर्यन खान 2 ऑक्टोबरच्या रात्री नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या टीमने बॅलार्ड पियरच्या ग्रीन गेटवरून क्रूझ कार्डिलावर पकडला, जेव्हा तो आपल्या मित्रांसह मुंबईहून गोव्याला पार्टीला जात होता. 12 तासांच्या चौकशीनंतर आर्यन खानला इतर सात आरोपींसह अटक करण्यात आली. त्याच दिवशी म्हणजे 3 ऑक्टोबर रोजी आर्यन खानला मुंबईच्या मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. येथे आर्यनला 4 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी मिळाली. 4 ऑक्टोबर रोजी, आर्यनला पुन्हा किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले जेथे आर्यन आणि इतरांना न्यायालयाने 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीत पाठवले.
यानंतर, 7 ऑक्टोबर रोजी आर्यन तिसऱ्यांदा न्यायालयात हजर झाला जिथे त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, त्यानंतर 8 ऑक्टोबर रोजी आर्यनला एनसीबीने वैद्यकीय उपचार करून आर्थर रोड जेलमध्ये हलवले. आर्यन खान 8 ते 13 ऑक्टोबर दरम्यान आर्थर रोड कारागृहाच्या क्वारंटाईन बॅरेकमध्ये राहिला. 14 ऑक्टोबर रोजी आर्यन खानचा कोविड अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला सामान्य बॅरेकमध्ये हलवण्यात आले. आज आर्यनला सत्र न्यायालयातून जामीन मिळाला आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत आर्यन तुरुंगातून बाहेर येईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.