आर्यन खानला दिलासा नाहीच, 20 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

आर्यनच्या न्यायालयीन कोठडीमध्ये २० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
Aryan Khan
Aryan KhanDainik Gomantak

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून आर्यन खान प्रकरण अधिकच जोर धरत असताना आर्यनच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 20 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवल्याने तसेच उद्यापासून तीन दिवस सुट्ट्या आल्याने ही वाढ झाली आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनवाणी झाली. आर्यनच्या वतीने प्रसिध्द वकिल अमित देसाई आणि सतिश मानेशिंदे तर एनसीबीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी न्यायालयामध्ये युक्तीवाद केला आहे. त्यामुळे आर्यनच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. याआधी न्यायालयाने आर्यन खानची याचिका फेटाळली होती, मात्र यावेळी न्यायालयाने आर्यनच्या याचिकेवरील निर्णय राखीव ठेवला आहे.

20 ऑक्टोबरला आर्यन प्रकरणाचा निकाल जाहीर होणार आहे. म्हणजेच आणखी सहा दिवस आर्यनसह त्याच्या सहकाऱ्यांना कोठडीमध्ये रहावे लागणार आहे. मात्र 20 ऑक्टोबर रोजी आर्यनला जामीन न मिळाल्यामुळे त्याची दिवाळी मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Aryan Khan
आर्यन खान प्रकरणात एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावीविरुद्ध लुकआऊट नोटीस

दरम्यान, बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) मुंबई क्रूझवर चाललेल्या अंमली पदार्थ पार्टीमधून अटक केल्याच्या वेळी किरण गोसावी नावाची व्यक्ती एनसीबी टीमसोबत उपस्थित होती. आता पुणे पोलिसांनी त्याच किरण गोसावीविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे आणि त्याला देशाबाहेर जाण्यास बंदी घातली आहे. किरण गोसावीविरोधात पुण्याच्या फरसाखाना पोलीस ठाण्यात 2018 मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोसावी याने सोशल मीडियाच्या माध्यमातून मलेशियात नोकरी मिळवण्याच्या नावाखाली युवकाला 3 लाख रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी 29 मे 2018 रोजी त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी गोसावी फरार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com