Satish Kaushik Dainik Gomantak
मनोरंजन

Satish Kaushik Death: मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण! पैसे द्यावे लागू नयेत म्हणून माझ्या पतीनेच ....

Satish Kaushik: सतीश कौशिक यांच्या मृत्यूबाबत दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत.

दैनिक गोमन्तक

Satish Kaushik: सतीश कौशिक याच्या अचानक झालेल्या निधनाने बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. आता सतीश कौशिक यांच्या मृत्यूबाबत दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत.

होळीच्या पार्टीनिमित्त मोठ्या बिल्डर आणि गुटखा कंपनीच्या मालकाने एका फार्महाऊसवर सतीश कौशिक यांना पार्टीसाठी बोलावले असल्याची माहीती समोर आली आहे. आता सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणाला वेगळे लागले असून विकास मालू नावाच्या बिझनेसमॅनच्या पत्नी सान्वी मालू हिने दिल्ली पोलिसांना पत्र लिहले आहे.

या पत्रात तिने आपल्या पतीनेच सतीश कौशिक यांचा खून केल्याचे म्हटले आहे. सान्वी मालूच्या म्हणण्यानुसार, विकास मालू आणि सतीश कौशिक यांच्यामध्ये 15 करोड रुपयांवरुन वाद चालू होता. हे पैसे द्यावे लागू नयेत म्हणून सतीश यांना चुकीची औषधे दिली गेली असतील अशी शंका तिने व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तपास करण्याची मागणीदेखील केली आहे.

आपल्यावर झालेल्या आरोपानंतर विकास मालू यांनी आपली बाजू स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. इन्साग्रामवर पोस्ट करत त्यांनी लिहले आहे की , सतीश मागच्या 30 वर्षापासून माझे कुटुंब होते.

मला वाईट दाखवायला दुनियेला 2 मिनिटही लागले नाहीत. आम्ही होळी( Holi ) साजरी केल्यानंतर झालेल्या दुखद घटनेबाबत मी विचारही करु शकत नाही. सगळ्यांच्या भावनांचा आदर करावा असेही विकास मालूने म्हटले आहे.

विकास मालूच्या पत्नीने केलेल्या वक्तव्यामध्ये काही तथ्य आहे का याची तपासणा करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ध्वनिरोधक फोम, चुकीचे डिझाईन, नियम उल्लंघन ठरले घातक; प्रशासनाच्या उदासीनपणाचा मोठा फटका; आपत्कालीन यंत्रणा कुचकामी

Goa Live News: हडफडे दुर्घटनेतील 3 कर्मचाऱ्यांवर झारखंडमध्ये अंत्यसंस्कार; मृतदेह सुखरूप पोहोचले

Porvorim: पर्वरी मार्गावरील धूळ प्रदूषण संबंधित अहवाल एकत्र करा, शिफारशींची 'पॅरा-वाईज' यादी द्या; न्यायालयाचे निर्देश

Horoscope: 'या' राशींवर आज बजरंगबलीची कृपा! सर्व अडचणी होतील दूर; वाचा तुमचा दिवस कसा जाईल

IPL 2026 लिलाव! 350 खेळाडूंची अंतिम यादी जाहीर; 'या' स्टार खेळाडूची अचानक एन्ट्री, मोठी बोली लागणार?

SCROLL FOR NEXT