Sara Ali Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Sara Ali Khan: 'तुझ्या नावातून अली काढून टाक' काय घडलं की साराला नेटकऱ्यांनी दिला असा सल्ला

Sara Ali Khan: राममंदिराच्या उद्घाटनाचा हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असला तरीही अजूनही याबद्दल चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

Sara Ali Khan: २२ जानेवारी २०२४ ला अयोध्येत रामलल्लाची स्थापना झाली. या सोहळ्याला अनेक भक्तांनी हजेरी लावली होती. याबरोबरच अनेक नामाकिंत व्यक्तीदेखील सहभागी झालेल्या पाहायला मिळाल्या. राममंदिराच्या उद्घाटनाचा हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असला तरीही अजूनही याबद्दल चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानने नुकतेच घृष्णेश्वरमधील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सारा महाराष्ट्रातील औरंगाबादपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या वेरूळ गावात असलेल्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पोहोचली होती. मंदिरात जाण्याची तीची काही पहिलीच वेळ नाही.

अभिनेत्री अनेकदा भगवान शंकराशी संबंधित मंदिरांना भेट देत असते. आता फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'जय भोलेनाथ.' असे लिहल्याचे पाहायला मिळाले आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये मंदिरात डोके टेकवून दर्शन घेत असल्याचे दिसत आहे.

आता सोशल मिडियावर तिच्या या फोटोंवर युजर्स मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एका युजरने म्हटले आहे की, 'एकच हृदय आहे, सारा जी, किती वेळा जिंकणार.' दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, सारा अली नसून सारा सनातनी आहे. तर एक जण म्हणाला, 'तुझ्या नावातून अली काढून टाक.' अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अनुराग बासूच्या 'मेट्रो... धिज डेज' या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये आदित्य रॉय कपूर, पंकज त्रिपाठी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT