Heera Mandi  Dainik Gomantak
मनोरंजन

Heera Mandi : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हीरा मंडी'चा फर्स्ट लूक रिलीज...

हीरा मंडी या बहुचर्चित चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

Rahul sadolikar

संजय लीला भन्साळी हे बॉलिवूडमध्ये नवे नवे प्रयोग करणारं नाव आहे. प्रेमकथा, इतिहासपट, कलात्मक चित्रपट अशा सगळ्या प्रकारातले चित्रपट भन्साळी यांनी बनवले आहेत. 'गंगूबाई काठियावाडी'नंतर आता संजय लीला भन्साळी वेब सीरिजच्या दुनियेत पाऊल ठेवणार आहेत. 

दिग्दर्शनाखाली 'हिरामंडी' हा वेब शो घेऊन येत आहे. त्याचा फर्स्ट लूक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख आणि शर्मीन सेगल रॉयल लूकमध्ये दिसत आहेत. या लूकनेच सर्वांना वेड लावले असून सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली आहे.

या व्हिडिओच्या सुरुवातीला संजय लीला भन्साळी यांचे नाव दिसत आहे. यानंतर मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, शर्मीन सेगल, रिचा चढ्ढा आणि शेवटी सोनाक्षी सिन्हा यांची झलक पाहायला मिळते. या सगळ्या सुंदर अभिनेत्री पिवळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये रॉयल लूकमध्ये दिसत आहेत. नेटफ्लिक्सवर लवकरच प्रदर्शित होणार असल्याचेही त्यावर लिहिले आहे.

'हिरामंडी'चा फर्स्ट लूक व्हिडिओ त्या काळातली गोष्ट सांगतो जेव्हा 'वेश्या' 'राणी' असायच्या. हे शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'अजुन एक काळ, अजुन एक युग, संजय लीला भन्साळी यांनी तयार केलेले आणखी एक जादूई जग, ज्याचा भाग होण्यासाठी आपण प्रतीक्षा करू शकत नाही. हिरामंडीच्या सुंदर आणि मनोरंजक जगाची येथे एक झलक आहे. लवकरच येत आहे!'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICU मध्ये असलेल्या मोरोक्कोच्या महिलेवर गोव्यात बलात्कार, सोलापूरच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरला अटक

Goa Pollution Control: नियंत्रण मंडळाचे मोठे पाऊल! किनारी, औद्योगिक भागातील प्रदूषण रोखण्यासाठी होणार तपासणी मोहीम

Gomantak Excellence Awards: संदीप नाडकर्णी यांचा ‘जीवन गौरव’ने सन्मान! ‘गोमन्तक’च्‍या पुरस्कारांचे 15 सप्‍टेंबरला वितरण

Goa Live Updates: वास्कोतील बेपत्ता मुलगा सापडला प्रयागराजमध्ये

Jatindranath Das: भगतसिंगांसोबत केले 63 दिवस उपोषण, तुरुंगातच सोडले प्राण; क्रांतिकारी 'जतिंद्रनाथ दास' यांचे स्फूर्तिदायक स्मरण

SCROLL FOR NEXT