Sanjay Dutt Latest News Dainik Gomantak
मनोरंजन

Sanjay Dutt : मुलींना इम्प्रेस करण्यासाठी संजय दत्त करायचा अमली पदार्थांचे सेवन

संजय दत्तला लोक चरसी म्हणायचे

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सध्या त्याचा नवीन चित्रपट 'KGF: Chapter 2' च्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. दरम्यान, संजय दत्तने अमली पदार्थांच्या व्यसनाशी लढतानाचे दिवस आठवले आहेत. त्याने सांगितले की लोक त्याला चरसी म्हणायचे. तो काळ त्याच्यासाठी खूप कठीण काळ होता.

संजय दत्तचे (Sanjay Dutt) आयुष्य चढ-उतारांनी भरलेले आहे. मात्र, तो त्याच्या अंमली पदार्थांच्या व्यसनाबद्दल उघडपणे बोलतो. माहितीनुसार, एका मुलाखतीदरम्यान संजय दत्तने सांगितले की, लोक त्याला चरसी म्हणायचे. तो पुनर्वसन केंद्रातून परतला होता तेव्हाची ही वेळ होती. तो म्हणाला, 'मी खूप लाजाळू होतो, विशेषतः मुलींबाबत. म्हणून मी मस्त दिसायला सुरुवात केली. अमली पदार्थ घेतल्यावर मुलींसमोर मस्त माणूस बनता यायच. म्हणून मी अमली पदार्थांच सेवन करायचो.

आयुष्याची 10 वर्षे एका खोलीत गेली

तो पुढे म्हणाला, 'मी माझ्या आयुष्यातील 10 वर्षे खोलीत आणि बाथरूममध्ये घालवली आहेत. मी शूटिंगमध्ये (Shooting) रस गमावला होता, पण मग सर्वकाही बदलले. जेव्हा मी पुनर्वसनातून परत आलो तेव्हा लोक मला चरसी म्हणायचे आणि मला ते चुकीचे वाटायचे. रस्त्याने चालताना लोक मला असे सांगायचे. मग मी वर्कआउट करायला सुरुवात केली. मला माझी प्रतिमा बदलायची होती आणि मग चरसीसोबत मी एक स्वॅग माणूस झालो. मला पाहून लोक म्हणायला लागले - 'क्या बॉडी है!'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT