Sameer Wankhede Dainik Gomantak
मनोरंजन

Sameer Wankhede :"मुलाला हात लावण्याआधी बापाशी बोल"या शाहरुखच्या डायलॉगला आता समीर वानखेडेंचे ट्विटने उत्तर?

अभिनेता शाहरुख खानच्या जवान चित्रपटातल्या डायलॉगला नेटीजन्सनी एनसीबीचे वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी जोडल्यानंतर आता समीर वानखेडेंनी ट्विट करुन उत्तर दिले आहे.

Rahul sadolikar

Sameer Wankhede viral Tweet : 31 ऑगस्ट रोजी अभिनेता शाहरुख खानचा मोस्ट अवेटेड जवानचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरमधल्या शाहरुखच्या वेगवेगळ्या लूक्सवर चर्चा झालीच ;पण त्यातल्या शाहरुखच्या एका डायलॉगची विशेष चर्चा झाली.

'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर' हा डायलॉग नेटीजन्सनी थेट एनसीबी वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी जोडला. शाहरुखचा मुलगा आर्यन खानला क्रूज ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर समीर वानखेडे प्रचंड चर्चेत होते. आता समीर वानखेडेंनी एक ट्वीट करुन अप्रत्यक्षपणे याचे उत्तर दिले आहे.

वानखेडेंचा संदेश

@RoflGandhi_ नावाचे ट्विटर एक अकाऊंट शाहरुखच्या एका फॅनचे आहे . पण समीर वानखेडेने त्याच्या X अकाऊंटवर @RoflGandhi_ असा टॅग करत ट्विट पोस्ट केले,

“मी जळलेल्या प्रत्येक पुलाच्या राखेवर मी आग चाखली आहे आणि नाचलो आहे. मला तुझ्यापासून नरकाची भीती वाटत नाही. - निकोल लियॉन्स. 

निकोल लियॉन्सचा एक कोट शेअर करत वानखेडेंनी ही आपली प्रेरणा असल्याचे सांगितले आहे” समीर वानखेडेंनी स्पष्टपणे आपल्या ट्रोलींगविरोधात ट्वीट केले नसले तरी, वेळ आणि टॅगवरून हे स्पष्ट होते की आर्यन खान अटक प्रकरणाशी जवानचा डायलॉग जोडणार्‍यांना वानखेडेंनी हा संदेश दिला आहे.

युजरचं ट्विट

शाहरुख आणि गौरी खानच्या प्रॉडक्शन हाऊसच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटने गुरुवारी जवानचा ट्रेलर रिलीज केल्यानंतर काही मिनिटांनी, @RoflGandhi_ या अकाऊंटने X म्हणजेच पूर्वीच्या ट्विट्टरवर एक पोस्ट केली.

“बेटे को हाथ लगने से पहले, बाप से बात कर” SRK ने स्पष्ट संदेश दिला आहे. #JawanTrailer द्वारे समीर वानखेडे आणि त्याचे दिल्लीतील हँडलर. तसेच जेव्हा तुम्ही हा संवाद ऐकता तेव्हा स्क्रीनवर 'गौरी खान निर्मित' असे म्हटले आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण

शाहरुखचा मुलगा आर्यनला 2021 मध्ये ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. आर्यनला अखेर जामीन मिळण्यापूर्वी हा अजामीनपात्र गुन्हा असल्याने या प्रकरणाचा तपास काही आठवडे चालला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या समीर वानखेडेवर शाहरुखकडून लाच मागितल्याचा आरोप असल्याने सीबीआयने आर्यनला क्लीन चिट दिली होती.

जवानची गोष्ट

जवानाचे कथानक एका पिता-पुत्राच्या कथेभोवती फिरते, ज्यामध्ये शाहरुख दुहेरी भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये एका ठिकाणी, शाहरुखच्या वडिलांचे पात्र म्हणते, "बेटे को हाथ लगाने से पहले, बाप से बात कर."

एटली कुमार दिग्दर्शित जवान या चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर, प्रियमणी, योगी बाबू आणि रिद्धी डोग्रा यांच्याही भूमिका आहेत. यात दीपिका पदुकोण स्पेशल अपिअरन्समध्ये आहे. हा अॅक्शन थ्रिलर हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत 7 सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

SCROLL FOR NEXT