Vijay Deverakonda
Vijay DeverakondaDainik Gomantak

Vijay Deverakonda : विजय देवरेकोंडासोबत सेल्फी घेताना चाहत्याला धक्काबुक्की...व्हिडीओ व्हायरल

साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत सेल्फी घेताना एका चाहत्याला धक्काबुक्की करण्यात आली, हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
Published on

Vijay Devarakonda Viral Video : एका सुपरस्टारसाठी त्याचे चाहते हेच त्याची ताकद असतात. चाहत्यांच्या प्रेमाच्या बळावरच स्टार्स आपला स्टारडम टिकवुन ठेवणारे चाहतेच असतात. चाहते आपल्या स्टार्ससाठी जीव ओवाळून टाकतात. पण या चाहत्यांच्या नशीबी बऱ्याचदा अपमान येतो. विजय देवराकाेंडाच्या या व्हायरल व्हिडीओत हेच दिसतं.

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एक त्याच्या 'कुशी' चित्रपटामुळे आणि दुसरे एका व्हिडिओमुळे. 

हा व्हिडिओ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा आहे, ज्यामध्ये त्याच्या चाहत्याला धक्काबुक्की करण्यात आली होती. हे पाहिल्यानंतर अभिनेत्याची प्रतिक्रिया काय होती ते जाणून घेऊया.

विजयच्या चाहत्याला ढकलले

कबीर सिंह फेम अभिनेता विजय देवराकोंडाचा हा व्हिडीओ एका प्रमोशनदरम्यानचा आहे. विजय देवरकोंडा सध्या त्याच्या 'कुशी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 1 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. यात सामंथा रुथ प्रभू देखील आहेत. 

दरम्यान, विजयचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ त्याच्या एका चाहत्याशी संबंधित आहे. विजयच्या एका चाहत्याला सेल्फी काढताना अपमानास्पदरित्या स्टेजवरुन ढकलण्यात आले. 

विजयचे कुशी चित्रपटाचे प्रमोशन

व्हिडिओमध्ये दिसत आहे की विजय देवराकोंडा त्याच्या कुशी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात आहे. विजय स्टेजवर उभा आहे. व्हिडीओत कुशी चित्रपटाचे पोस्टर लावलेले आहे.

एकामागून एक त्यांचे फॅन्स विजयसोबत सेल्फी घेताना दिसत आहेत. त्यानंतर हातात माईक घेतलेला एक व्यक्ती जो कदाचित या कार्यक्रमाचा होस्ट असावा, रागाने पुढे सरकतो आणि विजयच्या चाहत्याला स्टेजवरुन ढकलतो.

लायगर नंतर विजयचा कुशी

स्टेजवर फॅन सेल्फी घेत असताना संबंधित होस्ट त्या फॅनला धक्का मारताच खुद्द विजय देवराकोंडाही धक्का बसला. विजय काही बोलण्याआधीच आणखी 2 जण पुढे सरसावतात आणि त्या फॅनला स्टेजवरून खाली उतरवतात.
विजयने 2022 मध्ये 'लायगर' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अनन्या पांडेही यात मुख्य भूमिकेत होती, पण हा चित्रपट खूप फ्लॉप ठरला. आता वर्षभरानंतर त्याचा 'कुशी' चित्रपट आला आहे.

Vijay Deverakonda
Ashiqui 3 Updates : आशिकी 3 मध्ये कार्तिक आर्यनसोबत रोमान्स करणार ही अभिनेत्री..

विजयचे आगामी चित्रपट

विजय देवराकोंडाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर विजय दोन चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. असे सांगितले जात आहे की तो 'अर्जुन रेड्डी' फेम दिग्दर्शक संदीप वंगा रेड्डीसोबत पुन्हा एक चित्रपट करत आहे ;पण याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com