Salman Khan's New Song Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan's New Song :क्या बात है? सलमानच्या नव्या गाण्यात राम चरण...'किसी का भाई किसी की जान'चं 'येंतम्मा' गाणं रिलीज

सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातलं नवं गाणं झालं रिलीज...

Rahul sadolikar

सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. तत्पूर्वी या सिनेमातील गाणी रिलीज झाली असून यांना सिनेप्रेमींचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.

रोमँटिक ट्रॅक 'नैय्यो लगदा', पंजाबी डान्स नंबर 'बिल्ली बिल्ली', 'फॉलिंग इन लव्ह' आणि 'बठुकम्मा' या गाण्यांनंतर हिंदी-तेलुगू फ्यूजन असलेले 'येंतम्मा'हे नवे गाणे आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

'येंतम्मा'हे गाणे हिंदी आणि तेलुगू प्रेक्षकांसाठी नक्कीच एक ट्रीट आहे. तसेच, या गाण्यात सलमान खान, व्यंकटेश दग्गुबाती, आणि पूजा हेगडेसह राम चरणला देखील एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळणार आहे.

या गाण्यात सलमान खान अनेक रूप आणि रंगांमध्ये दिसत आहे. अशातच, मनोरंजनाने भरपूर असलेल्या 'येंतम्मा'या गाण्याला वर्षातील सर्वात कूल स्वॅग सॉंग होऊ शकतं यात शंका नाही.

सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा 'किसी का भाई किसी की जान'या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग हे कलाकार दिसतील.

त्याचबरोबर अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. अशातच, अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला 'किसी का भाई किसी की जान'हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारा रिलीज करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT