Salman Khan
Salman Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan: दबंग खानच्या जीवाला धोका? सुरक्षेसाठी मागितला शस्त्र परवाना

दैनिक गोमन्तक

Salman Khan Meet Police Commissioner: बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून गॅंगस्टरच्या निशाण्यावर आहे. याचा खुलासा नुकताच झाला जेव्हा गँगस्टर बिश्नोईने पोलिसांच्या चौकशीत सांगितले की, 'सलमानला मारण्याची योजना 2018 मध्येही बनवण्यात आली होती, परंतु काही कारणास्तव ही योजना फसली.'

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सलमान खानचे वडील सलीम खान यांना एक पत्र आले होते, ज्यामध्ये सलमानचा सिद्धू मुसेवाला केला जाईल, अशी धमकी देण्यात आली होती. म्हणजेच त्याची हत्या केली जाईल. या धमकीनंतर भाईजानची सुरक्षा वाढवण्यात आली होती.

याच दरम्यान, सलमानने स्वत:च्या सुरक्षेसाठी म्हणजेच शस्त्र परवान्यासाठी अर्ज केल्याची बातमी आहे. खुद्द मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) याबाबत माहिती दिली आहे. सलमान खानने आज पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. त्यानंतर या भेटीचे अनेक कयास लावले गेले. आता खुद्द मुंबई पोलिसांनी याबाबत एक निवेदन जारी केले आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, "अलीकडेच धमकीचे पत्र मिळाल्यानंतर, अभिनेता सलमान खानने मुंबई सीपी कार्यालयात स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला.''

काय आहे संपूर्ण प्रकरण?

काही दिवसांपूर्वी सलमान खानचे (Salman Khan) वडील सलीम खान सकाळी जॉगिंगसाठी गेले होते. तिथे ते ज्या बेंचवर बसले त्यावर एक चिठ्ठी होती, ज्यामध्ये त्यांना आणि मुलगा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमानचा सिद्धू मुसेवाला केला जाईल, असे या पत्रात लिहिले होते. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर काही दिवसांनीच सलीम खान यांना हे पत्र मिळाले होते. या पत्रानंतर सलमानच्या रुटीन लाईफमध्ये बदल झाला होता. सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. सध्या सलमान आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सलमान खान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर आहे. खुद्द लॉरेन्सने ही गोष्ट मान्य केली आहे. 2018 मध्ये सलमान माझ्या निशाण्यावर होता, परंतु तो बचावला, असेही लॉरेन्सने सांगितले आहे. लॉरेन्स सध्या पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Goa's News Wrap: ताळगाव निवडणूक निकाल, फोंड्यात खून; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT