Tiger 3 Dainik Gomantak
मनोरंजन

Tiger 3 First Look: सलमान-कॅटरीनाच्या 'टायगर 3' चा फर्स्ट लूक आला समोर

गोमन्तक डिजिटल टीम

Tiger 3 First Look: सलमान खान (Salman Khan) आणि कॅटरीना कैफ (Katrina Kaif) यांच्या आगामी 'टायगर 3' या चित्रपटाचा फर्स्ट लूक आणि चित्रपटाची रीलीज डेट समोर आली आहे. सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही घोषणा केली आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर रीलीज करण्यात आले असून नेहमी ईद दिवशी चित्रपट रीलीज करणारा सलमान हा चित्रपट मात्र दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे.

तथापि, सलमान-कॅटच्या चाहत्यांना अजून बरीच वाट पाहावी लागणार आहे. पुढच्या वर्षी दिवाळीत हा चित्रपट रीलीज होणार आहे. सुरवातीला हा चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी रीलीज होणार होती, मात्र आता नवीन डेट जाहीर केली गेली आहे.

सोबतच चित्रपटाचे पहिले पोस्टर रीलीज केले गेले आहे. यात एकटा सलमानच असून त्याचा केवळ एक डोळा या पोस्टरमध्ये दिसून येत आहे. त्याचा लूक इंटेन्स दिसत आहे. सलमान यात पुन्हा एकदा टायगर आणि कॅटरिना ही झोया या भूमिकेत आहेत. टायगर हा भारताच्या रॉ या गुप्तचर संघटनेचा तर झोया ही पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेची हेर असते.

हा चित्रपट पॅन इंडिया रीलीज होणार असून हिंदीसह तमिळ, तेलगू या भाषेतही येत आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात इम्रान हाश्मी निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. मनिष शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

सरप्राईझ पॅकेज

'टाइटर 3' हा यशराज फिल्म्सच्या 'टाइगर' फ्रँचायजीतील तिसरा चित्रपट आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) कॅमियो असणार आहे. यशराजच्या 'पठाण'मध्ये शाहरूख मुख्य भुमिकेत आहे. त्याच भूमिकेत शाहरूख 'टायगर 3' मध्ये दिसेल. प्रेक्षकांसाठी हे सरप्राईझ पॅकेज असणार आहे. याशिवाय यशराज बॅनर मार्व्हल स्टुडियोजच्या मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स प्रमाणे स्वतःचा एक स्पाय युनिर्व्हस बनवत आहे. त्यात पुढे जाऊन एकाच चित्रपटात त्यांचे टायगर, पठाण आणि 'वॉर'मधील कबीर (हृतिक रोशन) हे तिघेही हेर एकत्र दिसू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT