Salaar  Dainik Gomantak
मनोरंजन

Salaar OTT Release: हिंदीबरोबर काही वैर आहे का? सालार ओटीटीवर येताच चाहत्यांचा प्रश्न

Salaar OTT Release: हा 22 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि शाहरुख खानच्या 'डंकी'ला मागे पाडले होते.

दैनिक गोमन्तक

Salaar OTT Release: प्रभासचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'सालार : पार्ट वन - सीझफायर' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता. आता हा चित्रपट ओटीटीवर दार ठोठावत आहे. तो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

आतापर्यंत तारखेबाबत अनेक अटकळ बांधल्या जात होत्या, मात्र आता तारीखही जाहीर झाली आहे. प्रशांत नीलचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 20 जानेवारीला प्रदर्शित होईल. मात्र, चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे कारण त्याचा प्रीमियर हिंदी वगळता 4 भाषांमध्ये होणार आहे.

'सलार'ने भारतात 400 कोटींहून अधिक कमाई केली. हा 22 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि शाहरुख खानच्या 'डंकी'ला मागे पाडले होते. यामध्ये प्रभासशिवाय पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

नेटफ्लिक्सने शेअर केलेल्या पोस्टमध्ये हा चित्रपट तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हा चित्रपट हिंदी भाषेत उपलब्ध होणार नाही. त्यामुळे सोशल मिडियावर याच्यासंबंधित उलटसूलट चर्चा रंगल्या आहेत? एका यूजरने 'हिंदी लोकांशी काही वैर आहे का?' असा प्रश्नही विचारला आहे.

सालारचा सीक्वलही बनणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्याने सांगितले होते की, प्रभास आणि प्रशांत दोघेही 'सालार 2' करण्यासाठी उत्सुक आहेत. याशिवाय प्रभास 'कल्की 2898 एडी'मध्ये दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT