Retrospective section in IFFI 52th 2021 Dainik Gomantak
मनोरंजन

IFFI 52th रिट्रोस्पेक्टिव्ह विभाग

रशियन चित्रपट दिग्दर्शक आंद्रेई कोंच्यालोवस्की हॉलीवूड तसेच समकालीन रशियन चित्रपट क्षेत्रातले एक महत्त्वाचे नाव आहे.

दैनिक गोमन्तक

20 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या 52व्या इफ्फीत (IFFI 52th) सुप्रसिद्ध हंगेरियन चित्रपट-दिग्दर्शक बेला तार, रशियन नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक आंद्रेई कोंच्यालोवस्की आणि यंदाचे दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते रजनीकांत यांचे चित्रपट दर्शकांना रिट्रोस्पेक्टिव्ह विभागात पाहायला मिळणार आहेत.

‘लॉंन्ग टेक’साठी प्रसिद्ध असलेले बेला तार कधीकधी एक शॉट घेण्यासाठी एक महिन्याचा काळदेखील घेतात. आपल्या सिनेमातल्या प्रदीर्घ (काही तर जवळजवळ अकरा मिनिटांचे) शॉटने ते एक प्रकारे ‘कॅथर्सिस’चा उदभव दर्शकांच्या मनात तयार करतात. उदाहरणार्थ त्यांनी 2011 साली बनवलेला ‘द टूरीन हॉर्स’मधला सुरुवातीचा शॉट. बर्लिन, कान, लोकांर्नो या चित्रपट महोत्सवात त्यांचे सिनेमा गाजले आहेत. अतिशय वेगळ्या दृश्य रचनांच्या शैलीतून ते आपला चित्रपट सादर करतात.

रशियन चित्रपट दिग्दर्शक आंद्रेई कोंच्यालोवस्की हॉलीवूड तसेच समकालीन रशियन चित्रपट क्षेत्रातले एक महत्त्वाचे नाव आहे. 2020 साली त्यानी दिग्दर्शित केलेला ‘डियर कॉम्रेड’ या इतिहासपटाला वेनिस महोत्सवात विशेष ज्युरी अवॉर्ड लाभला होता. त्यांच्या त्या चित्रपटाचा गौरव ‘मास्टरपीस’ अशा शब्दात झाला होता. जगभरच्या अनेक महोत्सवातून त्यांच्या चित्रपटांना पुरस्कार लाभले आहेत. या इफ्फीत अलीकडच्या काळात दिवंगत झालेले प्रसिद्ध अभिनेते सीन कॉनेरी यांनाही आदरांजली वाहण्यात येईल. ‘जेम्स बॉण्ड’ ही गाजलेली व्यक्तिरेखा सादर करणारे ते पहिले अभिनेते होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: जो खिलाफ है मेरे मैं उनके विरुद्ध तो नही, पर हाँ... प्रदर्शन करणाऱ्या महिलेसमोर उभा ठाकला तिचाच पोलिस पती; पाहा सुंदर व्हिडिओ

North Goa: सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धूम्रपान करणाऱ्यांची खैर नाही! 66 जण ताब्यात; उत्तर गोव्यात पोलिसांची मोठी कारवाई

Viral Video: प्रवाशांच्या जीवाशी खेळ! एसी डब्यात सिगारेट ओढणाऱ्या तरुणीचा हंगामा; प्रवाशांनी विरोध करताच सुरु झाली बाचाबाची

Duleep Trophy 2025 Final: 11 वर्षांनंतर सेंट्रल झोनच्या झोळीत दुलीप ट्रॉफी, अंतिम सामन्यात दक्षिण विभागाचा 6 विकेट्सने पराभव

"99 प्रॉब्लेम्स आहेत, पण नवऱ्याची कटकट नाही", दक्षिणी अभिनेत्रीचे डिवोर्स फोटोशूट; नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT