Ravindra Berde Passes Away Dainik Gomantak
मनोरंजन

Ravindra Berde Passes Away: सिनेसृष्टीत शोककळा! रविंद्र बेर्डे यांचे निधन

Ravindra Berde Passes Away: चंगू मंगू, हाच सूनबाईचा भाऊ, एक गाडी बाकी अनाडी, हमाल दे धमाल अशा अनेक चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

दैनिक गोमन्तक

Ravindra Berde Passes Away: मराठी मनोरंजन सृष्टीतील जेष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहीती समोर आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून ते घशाच्या कॅन्सरबरोबर झुंज देत होते. टाटा हॉस्पिटलमध्ये ते त्यासाठी उपचार घेत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना दवाखान्यातून घरी आणण्यात आले होते. मात्र आज त्यांचे हृदयविकाराचे झटक्याने निधन झाले आहे.

१९९५ ला व्यक्ती आणि वल्ली या नाटकात काम करताना त्यांना पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आला होता. २०११ मध्ये त्यांना घशाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले होते.

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेल्या चित्रपटात विनोदी भूमिका निभावत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. चंगू मंगू, हाच सूनबाईचा भाऊ, एक गाडी बाकी अनाडी, हमाल दे धमाल अशा अनेक चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

मराठी चित्रपटाबरोबर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. 'सिंघम' या लोकप्रिय चित्रपटातदेखील त्यांनी भूमिका निभावली होती.

लक्ष्मीकांत बेर्डे आणि रविंद्र बेर्डे या भावांच्या जोडीने अनेक चित्रपटातून एकत्र काम करत मराठी प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे. आता ते दोघेही जगात नसल्याने महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT