KBC Jr Dainik Gomantak
मनोरंजन

KBC मध्ये 1 कोटी जिंकणारा तो 14 वर्षांचा मुलगा आता IPS बनलाय...

अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसुन 1 कोटी जिंकणाऱ्या त्या 14 वर्षीय मुलाने नंतर आपलं करिअर घडवत मोठा अधिकारी बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे.

Rahul sadolikar

अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपती हा शो माहित नाही असा प्रेक्षक सापडणे मुश्कील आहे. टिव्हीच्या प्रेक्षकांसाठी हा शो सहकुटूंब मनोरंनाचं माध्यम आहे.

आजवर कित्येक स्पर्धकांनी या शोच्या माध्यमातून आपला प्रवास अविस्मरणिय बनवला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या कित्येक कुटूंबांना या शोने उभं केलं.

काही लोकांना या शोनंतर मोठं यश मिळालं आणि त्यांची स्वप्नं साकार केली. आज पाहुया या शोमध्य काही वर्षांपूर्वी सहभागी झालेल्या एका छोट्या मुलाची गोष्ट

करनजीत 15 व्या सीजनचा पहिला करोडपती

सध्या 'कौन बनेगा करोडपती 15'ची बरीच चर्चा आहे. या सीझनला जसकरण सिंगच्या रूपाने पहिला करोडपती विजेता मिळाला आहे. 

जसकरण सिंगने 1 कोटी रुपये जिंकले.  'केबीसी'प्रमाणे 'केबीसी ज्युनिअर' सुरू झाला होता. य़ा सीझनमध्ये अनेक प्रतिभावान मुलांची ओळख देशाला झाली.

रवी मोहन सैनी

'कौन बनेगा करोडपती'चा ज्युनियर फॉरमॅट 2001 मध्ये मुलांसाठी सुरू झाला होता. तुम्हाला 'केबीसी ज्युनियर'च्या पहिल्या सीझनचा विजेता रवि मोहन आठवतोय? 

हा पहिला सीझन जिंकला तेव्हा रवी मोहन अवघ्या 14 वर्षांचे होते. आज इतक्या वर्षांनंतर जेव्हा रवी मोहन एक नव्या रुपात दिसले तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

आज ते IPS अधिकारी आहेत, गुजरातमध्ये सध्या त्यांची पोस्टींग आहे. चला पाहुया केबीसी ज्युनिअरच्या पहिल्या विजेत्याची गोष्ट

रवी मोहन गुजरातच्या पोरबंदरला अधिकारी

रवी मोहन सैनी यांनी 2001 मध्ये सुरू झालेल्या केबीसी ज्युनिअरमध्ये भाग घेतला. त्यानंतर त्याने सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन एक कोटी रुपये जिंकले. 

आता 22 वर्षांनंतर ते गुजरातच्या पोरबंदरचे एसपी आहेत. 2020 मध्ये 'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना रवि मोहन सैनी यांनी त्यांचा प्रवास शेअर केला होता.

रवी मोहन सैनींचे अथक परिश्रम

रवी मोहन सैनी यांनी सांगितले होते की, शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जयपूरच्या महात्मा गांधी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले. 

इंटर्नशिप दरम्यान त्याने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली. 

परीक्षेसाठी रवीमोहन सैनी यांनी कुठूनही कोचिंग घेतले नाही. रविमोहन सैनी यांचे वडील नौदलात असल्याने त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन ते पोलीस दलात दाखल झाले.

रवीमोहन सैनींना तिसऱ्या प्रयत्नात यश

रवीमोहन सैनी 2014 मध्ये भारतीय पोलीस सेवेसाठी पात्र ठरले. त्यांचा ऑल इंडियन रँक होता 461. रवी मोहनने तिसऱ्या प्रयत्नांत ही परीक्षा उत्तीर्ण केली होती.

रवि सैनी यांनी  2012 मध्ये त्यांनी पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली. पण या परिक्षेत त्यांना यश मिळाले नाही. 2013 मध्ये पुन्हा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना भारतीय पोस्ट आणि कम्युनिकेशन विभागात नोकरी मिळाली.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT