Rashmika Samantha Alia Dainik Gomantak
मनोरंजन

Rashmika Mandanna: आलिया, समंथाबाबत रोड ट्रिपवर जायची इच्छा...

अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुडबॉय'मधून बॉलीवुडमध्ये पदार्पणासाठी रश्मिका सज्ज

गोमन्तक डिजिटल टीम

Rashmika Mandanna:साऊथ सेन्सेशन रश्मिका मंदाना ही 'गुडबाय' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एंट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रश्मिकाने तिला बी टाऊनमधील कुणाकुणासोबत काम करायचे आहे आणि कुणासोबत काय करायची इच्छा तिच्या बकेटलिस्टमध्ये आहे, याबाबत माहिती दिली.

एका मुलाखतीत बोलताना रश्मिका म्हणाली की, मला समंथा रूथ-प्रभू (Samantha Ruth Prabhu) सोबत काम करायला आवडेल. समंथाशी एक कनेक्शन असल्यासारखे वाटते. समंथा नेहमीच माझ्याबाजूने असते. ती एका बाहुलीसारखी आहे.

बॉलीवूडमध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt) च्या कामाने मीच नाही तर प्रत्येकजण प्रभावित झाला आहे. समंथा आणि आलियासोबत एक मॅड कूल फिल्म बनविण्याची इच्छा आहे. जर संधी मिळाली तर या दोघींसोबत रोड ट्रिपवर जायला आवडले, अशी इच्छाही रश्मिकाने व्यक्त केली.

'गुडबाय'मध्ये रश्मिका सोबत अमिताभ बच्चन, नीना गुप्ता यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय रश्मिकाकडे इतरही महत्वाचे प्रोजेक्ट आहेत. ज्यात ती विविध कलाकारांसोबत काम करत आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती 'मिशन मजनू'मध्ये काम करत आहे. हा चित्रपट पाकिस्तानविरोधातील गुप्तचरांच्या एका मोठ्या मिशनवर आधारित आहे.

तर रणबीर कपूर, अनिल कपूर यांच्यासोबत 'अॅनिमल'मध्ये काम करत आहे. 'कबीर सिंग'चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वनगा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याशिवाय अनुराग बसू दिग्दर्शित 'आशिकी ३'मध्ये अभिनेता कार्तिक आर्यनच्या अपोझिटही ती दिसू शकते. कार्तिक आणि रश्मिका एका जाहिरातीतही एकत्र काम करत आहेत.

अभिनेता अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा : द रायझिंग' या चित्रपटामुळे रश्मिका देशभरात श्रीवल्ली म्हणून नावारूपाला येण्यापुर्वीच ती दक्षिण भारतीय हिंदी डब्ड चित्रपटातून नॅशनल क्रश बनली होती. समंथाला देशभरातून मोठी फॅन फॉलोविंग लाभली आहे. 'पुष्पा'चा सीक्वेल 'पुष्पा : द रूल'मध्येही रश्मिका असणार आहे.

दरम्यान, मुलींच्या रोड ट्रिपवर आधारित असलेल्या फरहान अख्तरच्या 'जी ले जरा'या आगामी चित्रपटात आलिया, प्रियांका चोप्रा, कॅटरिना कैफ एकत्रित काम करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

SCROLL FOR NEXT