Adipurush Poster Launch: 'बाहुबली' प्रभास प्रभू रामाच्या रूपात

'आदिपुरूष' चित्रपटाचा फर्स्ट लूक'; अयोध्येत शरयुकिनारी २ ऑक्टोबरला रंगणार टीझर लाँचिंग सोहळा
Prabhas
Prabhas Dainik Gomantak
Published on
Updated on

Adipurush Poster Launch: ओम राऊत दिग्दर्शित बहुप्रतिक्षित 'आदिपुरूष' (Adipurush) या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक अखेर समोर आला आहे. या चित्रपटाचे टीझऱ पोस्टर लाँच करण्यात आले आहे. 'बाहुबली'चित्रपटातील अभिनेता प्रभासने (Prabhas) या चित्रपटात प्रभू रामाची भूमिका साकारली आहे.

Prabhas
Allu Arjun Video: अभिनेता अल्लू अर्जुनचा साधेपणा; सूवर्ण मंदिरात दर्शनासाठी उभा राहिला रांगेत

प्रभासने इस्टाग्राम पोस्टमध्ये 'आरंभ' अशी कॅप्शन दिली आहे. पोस्टरमध्ये एका गुडघ्यावर बसलेल्या आणि आकाशाकडे पाहत असलेल्या प्रभू रामाच्या हातात धनुष्याची ताणलेली प्रत्यंचा दिसते. या फर्स्ट लूकमधून या कॅरेक्टरची योद्धा ही ओळख दाखवली गेली आहे. सोशल मीडिया अकाऊंटवरून हे पोस्टर लाँच केले गेले आहे

अयोध्येत शरयू नदी किनारी होणार चित्रपटाचा टीझर लाँच

दरम्यान, २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी प्रभू श्री रामांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत शरयू नदीकाठावर या चित्रपटाचा टीझर लाँच केला जाणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी १२ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट आयमॅक्स आणि थ्री डी फॉरमॅटमध्येही असणार आहे. हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये हा चित्रपट रीलीज होणार आहे.

Prabhas
ऐश्वर्या रायच्या 'Ponniyin Selvan-1' ने रिलीज होण्याआधीच केली करोडोंची कमाई

५०० कोटी बजेट

चित्रपटाचे बजेट तब्बल ५०० कोटी रूपये इतके आहे. रामायण या महाकाव्यावर हा चित्रपट आधारीत आहे. प्रभासच्या भूमिकेचे नाव राघव असे आहे. यात अभिनेत्री कृती सेनन हीने जानकी ही भूमिका साकारली असून अभिनेता सैफ अली खान लंकेश ही भूमिका साकारत आहे. यापुर्वी ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी' चित्रपटातही सैफ अली खानने खलनायकी भूमिका साकारली होती.

नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्री कृती सेनन हीने प्रभाससोबत काम करण्याचा अनुभव खूप सुंदर होता, असे वक्तव्य केले होते. दरम्यान, अलीकडच्या काळात प्रभास आणि कृती एकमेकांना डेट करत असल्याच्याही चर्चा आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com