India Day Parade Yew York  Dainik Gomantak
मनोरंजन

India Day Parade:न्यूयॉर्कमध्ये रश्मिका-विजयचा बोलबाला! 43व्या इंडिया डे परेडमध्ये 'Co-Grand Marshals' चा मान

India Day Parade 2025: ४३व्या वार्षिक भारत दिनाच्या परेडमध्ये यंदा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा प्रमुख पाहुणे

Akshata Chhatre

न्यूयॉर्क: भारताची संस्कृती आणि कला जगभर पोहोचवणाऱ्या न्यूयॉर्कमधील 'फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन' (FIA) या संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ४३ व्या वार्षिक भारत दिनाच्या परेडमध्ये यंदा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा प्रमुख पाहुणे (Co-grand marshals) म्हणून सहभागी होणार आहेत.

सर्वे भवन्तु सुखिनः' - यंदाच्या सोहळ्याची खास संकल्पना

१७ ऑगस्ट रोजी मॅडिसन अव्हेन्यू येथे होणाऱ्या या भव्य सोहळ्याची संकल्पना 'सर्वे भवन्तु सुखिनः' ही ठेवण्यात आली आहे. 'सर्वे भवन्तु सुखिनः' या संस्कृत वाक्याचा अर्थ 'सर्वजण सुखी असोत' असा आहे. जगातील सध्याच्या अशांत वातावरणात शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्याचा संदेश यातून देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

'पैसे देऊन नव्हे, तर अभिमानाने सहभागी व्हा'

FIA चे अध्यक्ष, सौरिन पारिख यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले की, "ही परेड पैसे देऊन सहभागी होण्यासाठी नाही, तर अभिमानाने सामील होण्यासाठी आहे. आम्ही या सोहळ्यात सर्वसमावेशकतेला प्राधान्य देत आहोत." कोणत्याही व्यावसायिक प्रभावापेक्षा सामुदायिक भावना आणि अभिमान जपण्यावर त्यांचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

India Day Parade Yew York

एका फ्लोटपासून जगातील सर्वात मोठ्या सोहळ्यापर्यंतचा प्रवास

१९७० साली स्थापन झालेल्या FIA संस्थेचा गौरव करताना न्यूयॉर्कमधील भारताचे राजदूत बिनया एस. प्रधान यांनी कौतुक केले. ते म्हणाले, "गेल्या पन्नास वर्षांपासून FIA ही संस्था अमेरिकेत भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे."

१९८१ मध्ये केवळ एका फ्लोटने सुरू झालेल्या या परेडने आता जगातील सर्वात मोठ्या सोहळ्याचे रूप धारण केले आहे, असेही त्यांनी नमूद केले. ही संस्था भारतीय संस्कृतीचा प्रचार, सामाजिक सहभाग आणि भारत-अमेरिका संबंध दृढ करण्यासाठी काम करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT