Mardani 3 Dainik Gomantak
मनोरंजन

Rani Mukerji on Mardani 3: राणी मुखर्जी पुन्हा परतणार पोलीस दलात...या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच...

अभिनेत्री राणी मुखर्जीचा मर्दानी 3 या चित्रपटाच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.

Rahul sadolikar

Rani Mukerji on Mardani 3: अभिनेत्री राणी मुखर्जीचं सध्या मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे या चित्रपटासाठी जोरदार चर्चा होत आहे. पण राणी मात्र या आनंदात रमण्यापेक्षा पुढच्या चित्रपटाची तयारी करत आहे. राणी मुखर्जी आता मर्दानी 3 या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची तयारी करत आहे.

म्हणजेच आता गुन्हेगारांना घाम फोडायला शिवानी रॉय लवकरच पुन्हा एकदा पोलीस दलात दाखल होत आहे. 'मर्दानी' च्या दोन्ही भागांना प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली होती.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राणी म्हणाली “मला आशा आहे की लेखक पुढील भाग लवकर डेव्हलप करतील. मर्दानी ३ कधी येणार हे मला अनेकांनी विचारले आहे. पण चित्रपट हा स्क्रिप्टवर चालतो हे मी नेहमीच मांडले आहे. 

पुढे राणी म्हणाली जर स्क्रिप्ट रोमांचक नसेल, तर चित्रपट बनवण्यात काही अर्थ नाही,” 2014 मध्ये मर्दानी समोर आला होता. त्याच्या जबरदस्त यशानंतर 2019 मध्ये दिग्दर्शक गोपी पुथरान यांनी त्याचा सिक्वेल तयार केला".

कॉप थ्रिलरच्या तिसर्‍या भागासाठी राणी तयारी करत असताना, मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वेला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादाने मुखर्जी खूश आहेत.

आशिमा छिब्बर दिग्दर्शित जो सागरिका चक्रवर्ती हिने तिच्या दोन मुलांच्या ताब्यासाठी नॉर्वेजियन अधिकार्‍यांविरुद्ध केलेल्या प्रदीर्घ संघर्ष या चित्रपटात पाहायला मिळाला.

राणी म्हणते. “मला चित्रपट करताना बरे वाटले. असं मला शेवटच्या वेळी प्रकर्षाने जाणवलं होतं ते ब्लॅक दरम्यान." राणी मुखर्जीला तिच्या ब्लॅक चित्रपटाच्यावेळी मिळालेला एक अद्भुत अनुभव या चित्रपटाच्या वेळी मिळाला असं तिचं मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Houthi Rebels Attack Saudi Arabia: हौथी बंडखोरांचा सौदी अरेबियावर मोठा प्रतिहल्ला! 'अरामको'चे तेल प्रकल्प क्षेपणास्त्रे अन् ड्रोनने लक्ष्य

Narendra Modi Exam Reform Task Force: विद्यार्थ्यांच्या आक्रोशानंतर मोदी सरकारचे मोठे पाऊल; नंदन नीलेकणी यांच्याकडे 'टास्क फोर्स'ची धुरा

Veeresh Borkar RGP Office Dispute: आरजीपी कार्यालयात अनधिकृत प्रवेशास बंदी! आमदार वीरेश बोरकरांचे नियंत्रण; खोलकर यांच्या गटाने नोंदविला आक्षेप

Goa Farmers Traditional Farming: गोव्यात 17.186 हेक्‍टरवर प्राकृतिक, परंपरागत शेती! राज्‍यातील 9.668 शेतकऱ्यांना मिळाले तब्बल 12.83 कोटी रुपयांचे अर्थसाहाय्‍य

Bandoda villagers Oppose IIT Project: आयआयटीला बांदोडावासीयांचा विरोध; अन्यथा न्यायालयात जाणार, ग्रामसभेत निर्धार, 'कलम 39 अ' वरही चर्चा

SCROLL FOR NEXT