Rajamauli's Upcoming Hindi Movie: आता होणार धमाका...राजामौली करणार या अभिनेत्यासोबत प्रभासच्या ब्लॉकबस्टर फिल्मचा रिमेक

सुपरस्टार प्रभासच्या या प्रसिद्ध चित्रपटाचा रिमेक हा अभिनेता करणार असल्याची चर्चा आहे
Rajamauli Upcoming Hindi Movie
Rajamauli Upcoming Hindi MovieDainik Gomantak
Published on
Updated on

Rajamauli's Upcoming Hindi Movie: साऊथचे दिग्दर्शक एस एस राजामौली यांना न ओळखणारा सिनेमाचा रसिक सापडणे मुश्किल आहे. बाहुबली आणि यावर्षी धुमाकूळ घालणारा RRR चित्रपटांमुळे राजामौलींच्या आगळ्या वेगळ्या दिग्दर्शनाची शैली जगभरात पसंत केली गेली.

'नाटू नाटू' या RRR चित्रपटातल्या गाण्याला ऑस्कर मिळाल्यानंतर तर राजामौलींचा डंका जगभर वाजला गेला. आता राजामौली पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या ते साऊथचा सुपरस्टार प्रभासने केलेल्या एका चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्याच्या तयारीत आहेत.

2005 साली S.S राजामौली आणि प्रभास यांच्या 'छत्रपती' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. याच चित्रपटाचा हिंदी रिमेक घेऊन राजामौली बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.

पण या चित्रपटात बॉलिवूडचा अभिनेता नाही तर साऊथचा अभिनेता बेल्लमकोंडा साई श्रीनिवास काम करणार आहे .

ट्रेड अॅनिलिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मिडीयावर या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत ही माहिती दिली.

पेन स्टुडिओ निर्मित हा चित्रपट 12 मे रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचा टक्कर रणदीप हुडाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाशी होणार आहे

Rajamauli Upcoming Hindi Movie
Taapsee Pannu New Film: समंथा रुथ प्रभू अन् तापसी पन्नूच्या एकत्र झळकणार रूपेरी पडद्यावर

या चित्रपटाशिवाय अजय देवगणचा भोला हा चित्रपटही 30 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट कैथी या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे.

तर दुसरीकडे 7 ए्प्रिल रोजी अभिनेता आदित्य रॉय कपूरचा गुमराह हा 'थडम' तमिळ चित्रपटाचा रिमेक येत आहे. थोडक्यात 2023 साल हे तमिळ चित्रपटांच्या हिंदी रिमेकचे वर्ष आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com