HBD Ranbir Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

HBD Ranbir Kapoor : आलियाने लाडक्या पतीचा वाढदिवस असा साजरा केला...

अभिनेता रणबीर कपूरने नुकतंच वयाच्या 41 व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

Rahul sadolikar

Ranbir Kapoor 41 th Birthday Celebration with Alia Bhatt : अभिनेता रणबीर कपूर बॉलीवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. रॉकस्टार, बर्फी, तमाशा, ये जवानी है दिवानी या चित्रपटांतून रणबीरने आपल्या चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.

विनोदी, गंभीर भूमीकांसोबतच रणबीरने बर्फीसारख्या चित्रपटात अत्यंत आव्हानात्मक भूमीका साकारली आहे.

रणबीर सध्या अॅनिमल चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यामुळे चर्चेत आहे. चित्रपटासोबतच रणबीर आणखी एका कारणाने आज चर्चेत आहे.

रणबीर 28 सप्टेंबर रोजी 41 वर्षांचा झाला आहे, त्याचा हा वाढदिवस त्याने पत्नी आलिया भट्टसोबत साजरा केला असुन सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

रणबीर कपूरचा 41 वर्षांचा झाला

रणबीर कपूर 28 सप्टेंबरला 41 वर्षांचा झाला. त्याच्या 41 व्या वाढदिवसानिमित्त फिल्ममेकर्सनी 'अ‍ॅनिमल' च्या टीझरच्या रूपात एक अप्रतिम भेट दिली आहे, तर पत्नी आलिया भट्टनेही लाडक्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा यांनीही खूप प्रेमाचा वर्षाव केला आहे. नीतू कपूर आणि आलियाने मध्यरात्री रणबीरचा वाढदिवस साजरा केला आणि त्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले.

आलियाने शेअर केले रणबीरसोबतचे फोटो

रणबीर कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आलिया भट्टने काही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये ती रणबीरला किस करताना दिसत आहे. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये आलियाचे लग्नापासून ते दोघांनी एकत्र घालवलेल्या सुट्ट्यांपर्यंतचे अनेक फोटो आहेत.

मला सर्वात जास्त आनंद देणारी जागा 

फोटो शेअर करताना आलियाने रणबीर यांना शुभेच्छा दिल्या आणि लिहिले, 'माझे प्रेम, माझा सर्वात चांगला मित्र आणि मला सर्वात जास्त आनंद देणारी जागा. 

माझ्या शेजारी बसुन सिक्रेट अकाऊंटमधुन तू हे कॅप्शन वाचत असशील. मला फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा सांगायच्या आहेत बाळा. ते पूर्णपणे जादुई बनव.

नीतू कपूर यांनी शेअर केले फोटो

दरम्यान, आई नीतू कपूरने प्रिय रणबीर कपूरच्या वाढदिवसाच्या केकचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये आलिया आणि रणबीरची फोटो फ्रेम देखील दिसत आहे. 

रणबीरच्या वाढदिवसाचा केक खूपच स्पेशल आहे, ज्यावर लिहिले आहे- हॅप्पी बर्थडे राहा के पापा. नीतू कपूर यांनी आणखी एक फोटो शेअर केला ज्यावर लिहिले आहे- वाढदिवसाच्या शुभेच्छा. या खास व्यक्तीबद्दल मला नेहमीच कृतज्ञता वाटते.

Ranbir Kapoor 41 th Birthday
Ranbir Kapoor 41 th Birthday

अॅनिमल'चा टिझर रिलीज

प्रोफेशनल फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रणबीर आता 'अॅनिमल' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. 

हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल'मध्ये रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्याही भूमिका आहेत.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

SCROLL FOR NEXT