Animal Teaser
Animal TeaserDainik Gomantak

Animal Teaser : वडिल - मुलाच्या नात्यातील गोष्ट... रणबीरच्या 'ॲनिमल'चा टिझर रिलीज...

2023 च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांमध्ये रणबीर कपूरच्या ॲनिमलचाही समावेश आहे. नुकताच या चित्रपटाचा टिजर रिलीज झाला आहे.
Published on

Animal Teaser Release : अभिनेता रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित अ‍ॅनिमल चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झाला आहे. रणबीरच्या चित्रपटाचे नावच त्याच्या चाहत्यांना बुचकळ्यात टाकणारं आहे.

ब्रह्मास्त्रनंतर रणबीरने आता आपल्या प्रेक्षकांसाठी ही नवी भेट आणली आहे. अ‍ॅनिमलमध्ये रणबीरसह रश्मिका मंदन्ना आणि अनिल कपूरही दिसणार आहेत. चला पाहुया अ‍ॅनिमलच्या टिझरमध्ये नेमकं काय आहे?

अ‍ॅनिमल चित्रपटाविषयी

अ‍ॅनिमल हा 2023 साली चर्चेत असणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी अलीकडेच चित्रपटाच्या तीन पोस्टर्सचे अनावरण केले होते. या पोस्टरमध्ये अभिनेता रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना आणि बॉबी देओलही होते. (Animal Poster) 

अ‍ॅनिमलच्या पोस्टरमधील त्यांच्या तीव्र लूकने चाहत्यांना चित्रपटाच्या गाला रिलीजची आतुरतेने वाट पाहिली होती.

अ‍ॅनिमल थिएटर्समध्ये यायला चाहत्यांना अजुन थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे. तोपर्यंत प्रदर्शित झालेल्या टीझरमधून चाहत्यांना चित्रपटाची झलक पाहायला मिळणार आहे. 

रणबीरसह रश्मिका आणि अनिल कपूर

ॲनिमलचा बहुप्रतिक्षित टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये रणबीर कपूर ,अनिल कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

टीझरमध्ये सांगितल्याप्रमाणे “रक्तात कोरलेले पिता-पुत्राचे नाते” अनुभवायला मिळेल. टिझरमध्ये कलाकारांच्या अभिनयाची आणि भूमीकेची कल्पना येऊ शकते. टिझरमध्ये तुम्हाला कॅमेऱ्याची कमाल दिसू शकते.

Animal Teaser
Angelina Jolie : "त्यानंतरचं आयुष्य असं होतं"... ब्रॅड पिटसोबतच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली अँजोलिना

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

27 सप्टेंबरला रिलीज झालेल्या 'ॲनिमलचा'च्या टीझरला चाहत्यांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. 

रणबीरच्या एका चाहत्याने लिहिले “काय टीझर, रणबीर?”, “उत्साही” आणि “विलक्षण”, चाहत्यांच्या कमेंट्समधून ते रणबीरच्या ॲनिमल'च्या स्वागतासाठी सज्ज असल्याचं दिसू शकतं

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com