Ranbir Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

Ranbir Kapoor New look: अल्फा मेननंतर आता रणबीर बनणार डॅशिंग पोलीस अधिकारी! रोहितसोबत मिळवला हात, पाहा Photo

अॅनिमल चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करणाऱ्या रणबीर कपूरच्या पुढील चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आली आहे.

Puja Bonkile

Ranbir Kapoor New look: अॅनिमल चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करणाऱ्या रणबीर कपूरच्या पुढील चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आली आहे. रणबीर कपूरचे पोलिस लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये तो सिंघम चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत दिसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर लोकांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

पापाराझींनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये रणबीर कपूर पोलिस गणवेश आणि वाढलेल्या मिशीत डॅशिंग दिसत आहे. एका फोटोमध्ये दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत बोलत आहे. या फोटोंसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, रणबीर कपूर आणि रोहित शेट्टीचा आगामी प्रोजेक्ट? ते आल्यावर आपल्या सर्वांना कळेल.

मात्र हे फोटो कोणत्याही चित्रपटाची नसून एका जाहिरात चित्रपटासाठी शूट करण्यात आले आहेत. हे जाणून चाहत्यांची चांगलीच निराशा होणार आहे. पण रणबीर कपूरचा पोलीस अवतार पाहून चाहते खूपच खूश दिसत आहेत.

दरम्यान, रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि बॉबी देओलचा अॅनिमल 1 डिसेंबर रोजी रिलीज झाला होता. या चित्रुटाने गदर 2 आणि टायगर 3 चे सर्वकालीन बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडले आहेत. त्याच वेळी, चाहते अॅनिमलच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cooch Behar Trophy: ..गोव्याने पकड गमावली! 5 बाद 27 वरुन छत्तीसगडच्या 170 धावा; फलंदाजांची खराब सुरवात

Chess World Cup Goa: विश्वकरंडक बुद्धिबळात भारताची आशा आता अर्जुनवर, हरिकृष्णाचे आव्हान टायब्रेक फेरीतील पराभवाने संपले

Unwritten Horizon: ..आपला गोवा काय होता आणि काय बाकी राहिला आहे, हे सांगणारे प्रदर्शन ‘अनरिटन होरायझन’

IFFI 2025: आयसीएफटी युनेस्को गांधीपदक स्पर्धेतील चित्रपट कोणते? पहा लिस्ट..

Kamini Kaushal: 1948 ते 2022! मनोजकुमारचा शहीद ते आमीरच्या लालसिंग चढ्ढापर्यंत कार्यरत असणारी अभिनेत्री 'कामिनी कौशल'

SCROLL FOR NEXT