Ranbir Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

Ranbir Kapoor: 'अ‍ॅनिमल' च्या यशानंतर रणबीरने वाढवली फी

Ranbir Kapoor: 'संजू'मध्ये संजय दत्तची भूमिका साकारण्यासाठी रणबीर कपूरने 25 कोटी रुपये घेतले होते.

दैनिक गोमन्तक

Ranbir Kapoor: बॉलीवूडचे कलाकार नेहमीच चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे तर कधी त्यांच्या वक्तव्यांमुळे तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ते चर्चांचे कारण बनतात. आता बॉलीवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर चर्चेत आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर कपूरने अॅनिमल चित्रपटानंतर आपली फीस वाढवली आहे. रणबीर कपूरने त्याची फी 30 कोटींवरून 65 कोटी रुपये केली आहे. मात्र अभिनेत्याने अधिकृतपणे यावर कोणतेही भाष्य केले नाही. त्यांच्या कुटुंबीयांकडेही या शुल्कवाढीबाबत कोणतीही माहिती नसल्याचेही बोलले जात आहे. मात्र, अशा काही बातम्या समोर आल्या आहेत ज्यात रणबीरने 'अ‍ॅनिमल'साठी 70 कोटी रुपये घेतल्याचे म्हटले जात आहे.

‘संजू’ चित्रपटाच्या यशानंतरही रणबीरने त्याची फी वाढवल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर रणबीर कपूरने जाहिरातीसाठी फी वाढवली असल्याची बातमी आली होती. एका जाहिरातीसाठी त्याने आपली फी 8 कोटींवरून 12 कोटी रुपये केली असल्याची बातमी आली होती. 'संजू'मध्ये संजय दत्तची भूमिका साकारण्यासाठी रणबीर कपूरने 25 कोटी रुपये घेतले होते.

दरम्यान, रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट गेल्या वर्षी 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि चित्रपटगृहांमध्ये बंपर कमाई केली. रणबीरच्या या चित्रपटाने जगभरात 900 कोटींहून अधिक कमाई केली आहे. रणबीर कपूरच्या या चित्रपटाच्या यशामुळे त्याची ब्रँड व्हॅल्यू वाढली आहे.

काही दिवसांपूर्वी अॅनिमल चित्रपटाची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अनेक सेलेब्रिटी सहभागी होताना दिसले होते. नीतू कपूर आणि आलिया भट्ट या दोघींनी एकमेकांसोबत बोलणे टाळल्याने किंवा त्यांचे एकमेकांप्रति वागणे पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्यात रणबीर कपूरसाठी शीतयुद्ध चालले असल्याचा अंदाज बांधला होता. त्यांच्या नात्यावर सातत्याने चर्चा होतानादेखील दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT