Rakul Preet Singh And Jackky Bhagnani Wedding Update Dainik Gomantak
मनोरंजन

Rakul-Jackky Wedding: नवरी नटली! गोव्यात रकुल-जॅकीची लगीनघाई

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Weeding News: आता बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही लवकरच विवाहबंधनात अडणार आहे.

दैनिक गोमन्तक

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Weeding:

कलाकारांचे आयुष्य हा चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय असतो. रोजच्या आयुष्यात मोठ्या पडद्यावर, टीव्हीवर दिसणारे हे कलाकार कसे राहतात, त्यांची दिनचर्या कशी असते, त्यांच्या डाएटमध्ये काय असते, ते कोणत्या वेळी कोणत्या कपड्यांची निवड करतात तसेच हे कलाकार कसे सेलिब्रेशन करतात अशा अनेक गोष्टींबद्दल चाहत्यांना औत्सुक्य असते. कोण्या कलाकाराचे लग्न म्हणजे चाहत्यांसाठी उत्सवासारखेच असते. आता सोशल मिडियाच्या काळात या बड्या कलाकारांच्या आयुष्याबद्दलच्या सर्व अपडेट्स तात्काळ चाहत्यांपर्यंत पोहचत असतात.

आता बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह ही लवकरच विवाहबंधनात अडणार आहे. लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असून या कार्यक्रमाला अभिनेत्री तयार होऊन पोहचत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कारमध्ये रकुल दिसत आहे. काळ्या रंगाच्या साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत असल्याचे दिसत आहे. तिचे कुटुंबियदेखील तिच्यासोबत दिसत आहे.

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांचे लग्न मोठ्या चर्चेत आहे. या जोडप्याने अनोख्या पद्धतीने विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या दोघांनी पर्यावरणाचा विचार करत इको-फ्रेंडली लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. या लग्नात कोणत्याही प्रकारची फटाके फोडले जाणार नाहीत, कोणत्याही प्रकारचे ध्वनी प्रदूषण होणार नाही.

याबरोबच, कार्बन फूटप्रींटचा विचार करत लग्नादरम्यान ते पाऊले मोजून तितकी झाडेदेखील लावणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या जोडप्याची जोरात चर्चा सुरु आहे आणि मोठ्या प्रमाणात कौतुकदेखील केले जात आहे. रकुल आणि जॅकी आपल्या जवळच्या लोकांच्या सोबतीने गोव्यात लग्नगाठ बांधणार आहेत.

दरम्यान, जॅकी भगनानीने नुकतीच गोव्याला भेट दिली असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महत्वाचे म्हणजे या सोहळ्यादरम्यान ते ज्या हॉटेलमध्ये थांबणार आहेत, त्या हॉटेलच्या एका रुमचे भाडे ७५ हजार रुपए असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे हादेखील चर्चेचा विषय झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budargad Accident: गोव्याहून नेपाळकडे जाणाऱ्या बसचा अपघात! चालकाचे नियंत्रण जाऊन घुसली शेतात; 2 प्रवासी गंभीर जखमी

Horoscope: पैशाचा पाऊस पडणार, परदेशी जाण्याची संधी; 'या' राशींचे बदलणार भविष्य

Vinorda Theft: दरवाजा तोडला, दागिने-रोकड लंपास; दिवसाढवळ्या घरफोडीमुळे विर्नोड्यात खळबळ

Goa: शेतकऱ्यांसाठी दिलासा! ‘हजारी केळी’ बनली बागायतदारांसाठी ‘ढाल’; खेतींपासून होतोय बचाव

Goa Politics: खरी कुजबुज; भाऊ, किती खड्डे बुजविले?

SCROLL FOR NEXT