Rakhi Sawant Arrested Dainik Gomantak
मनोरंजन

Rakhi Sawant Acting School : राखी सावंत आता दुबईत शिकवणार अभिनय?

अभिनेत्री राखी सावंत तिच्या एका नव्या प्रवासाला सुरूवात करणार आहे

Rahul sadolikar

Rakhi sawant opens acting school in dubai : राखी सावंतला कोण ओळखत नाही? आपल्या कामापेक्षा राखी तिच्या वादग्रस्त आयुष्याबद्दल चर्चेत असते. आता राखी एका वेगळ्या कारणाने चर्चेत आह. पती आदिल खान दुर्रानीसोबत वैवाहिक वादातून जात असलेली ही अभिनेत्री दुबईत तिची ट्रेनिंग अॅकेडमी सुरू करण्याच्या तयारीत आहे. 

बॉलीवूड इंडस्ट्रीत येण्यास इच्छुक असलेल्या लोकांना ही अॅकेडमी प्रशिक्षण देईल. राखीने केवळ एका म्युझिक अल्बमसाठी शूट केले नाही तर आता ती दुबईमध्ये एक अभिनय अॅकेडमी उघडणार आहे. राखी सावंत तिच्या प्रशिक्षण अकादमीच्या उद्घाटनासाठी दुबईला रवाना झाली आहे, ज्यामध्ये इच्छुक कलाकारांना प्रशिक्षण दिले जाईल.

त्याबद्दल बोलताना राखी म्हणाली, "मी अल करामा येथे एक अकादमी उघडली आहे जी आखाती आणि इतर देशांतील महत्त्वाकांक्षी अभिनेत्यांना बॉलीवूडमध्ये काम देण्यासाठी प्रशिक्षण देईल".

सध्या राखी तिच्या लेटेस्ट म्युझिक व्हिडिओमुळे चर्चेत आहे. तिच्या प्रशिक्षण अकादमीच्या शुभारंभासाठी ती दुबईला रवाना झाली असताना ती आज विमानतळावर दिसली. तिचे अनेक चाहते तिला प्रत्येक ठिकाणी तिला साथ देत आहेत, तर काही जण तिला ट्रोलही करत आहेत.

म्हैसूरमध्ये आदिल खानच्या आई-वडिलांच्या सोबत असताना गेल्या आठवड्यात राखी सावंतला ट्रोल करण्यात आलं होतं. आदिल खानसोबत कायदेशीर लढाई असतानाही ती इस्लामिक विधी करताना दिसली.

सध्या राखी तिच्या आदिलसोबत चाललेल्या कायदेशीर वादातून थोडी मोकळी झाली आहे . हे प्रकरण अजुनही सुरू असलं तरीही राखी तिच्या नव्या कामाची सुरूवातही करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asrani Death: हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं! प्रसिद्ध डायलॉग मागील आवाज कायमचा शांत झाला; अभिनेते असरानींचे निधन

स्वप्नपूर्ती! फक्त 60 रूपयांत स्टेडियममधून पाहा टीम इंडियाचा कसोटी सामना, ऑफर कधी आणि कशी मिळेल? जाणून घ्या

Ponda Accident: कारने धडक दिल्याने एका 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

Viral Post: "विश्वचषक जिंकायचा असेल तर अजित आगरकर, गौतम गंभीरला हटवा", व्हायरल पोस्टवर नवज्योत सिंग सिद्धू संतापले

Horoscope: लक्ष्मीपूजन होणार फलदायी! दिवाळीच्या काळात 'या' 5 राशींना मिळणार यश आणि संपत्ती, वाचा सविस्तर दैनिक राशी भविष्य

SCROLL FOR NEXT