Rakhee Sawant  Dainik Gomantak
मनोरंजन

Rakhee Sawant: राखी सावंतच्या लग्नावर लव्ह जिहादचं सावट?

अखेर अभिनेत्री राखी सावंतचं लग्न झालं.. म्हैसुरच्या एका उद्योगपतीसोबत लग्नगाठ बांधलेली आहे पण सत्य काय आहे?

Rahul sadolikar

बॉलिवूडची नॉटी गर्ल अभिनेत्री राखी सावंतचं लग्न झालं आणि कित्येकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. सतत चर्चेत असणाऱ्या राखी सावंतने आता म्हैसुरचे उद्योगपती आदिल दुर्राणी यांच्यासोबत लग्न केले आहे. या लग्नाचा फोटोही सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

यापुर्वी राखीचं रितेश राजसोबत लग्न केलं होतं हे लग्न काही फार काळ टिकलं नाही. बिग बॉस संपल्यानंतर राखी सावंत बराच काळ उद्योगपती आदिल यांना डेट करत असल्याची चर्चा होती.

व्हायरल झालेल्या या फोटोत दोघे नोंदणी पद्धतीने लग्न केल्याचं दिसत आहे. एकमेकांना दोघांनी हार घातल्याचं दिसत आहे ;पण जेव्हा आदिल दुर्राणी यांना जेव्हा विचारले तेव्हा त्यांनी राखीसोबत लग्न झालं या गोष्टीला नाकारले.

व्हायरल झालेल्या या फोटोवर दुर्राणी यांनी नकार देताच आता आज राखीची प्रतिक्रिया याबाबतीत समोर आली आहे.

राखी म्हणते "आदिलला हे लग्न सगळ्यांंसमोर आणायचं नव्हतं. खरंतर आमचं लग्न 7 महिन्यांपुर्वीच झालं आहे. आम्ही निकाह केला आणि त्यानंतर ,या लग्नासाठी मी माझं नावही बदललं"

पण आता राखीच्याच सांगण्यानुसार आदिल तिच्याशी बोलत नाही. याला कारण 'लव जिहाद'ची भिती हे असल्याचंही आता समोर आलं आहे. राखी स्वत: या गोष्टीवर आता बोलली आहे, तिच्या मते आदिलला लव जिहादची भिती वाटत आहे शिवाय त्याच्यावर घरच्यांचा दबाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आता राखीची आई हॉस्पीटलमध्ये असुन राखी तिच्या वैवाहिक जीवनाचा संघर्षही सुरू आहे.

राखीचं लग्न झालं अशा बातमी असताना आता हा नवाच उलगडा झाल्याने राखीने आपली वादग्रस्त परंपरा कायम राखली आहे. हे प्रकरण राखीच्या आयुष्यासारखेच वळणाचे आहे हे नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT