Pathan Trailor :पठाणच्या ट्रेलरला 24 तासांत मिळाला एवढा प्रतिसाद?

पठाण चित्रपटाच्या ट्रेलरला रिलीज झाल्यानंतर केवळ 24 तासांत प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
Pathan Trailor
Pathan Trailor Dainik Gomantak

शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाचा वनवास संपला असं म्हणायला काही हरकत सध्या तरी दिसत नाही. हा चित्रपट गेल्या कित्येक दिवसांपासुन वादात सापडला होता.

पठाण चित्रपटातल्या 'बेशरम रंग' या गाण्यात घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीमुळे हा वाद एवढा पेटला होता की,बिहारमध्ये शाहरुखसह 5 जणांवर गुन्हे दाखल केले होते.

या चित्रपटात आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत असं म्हणुन काही ठिकाणी शाहरुखचे पोस्टर्सही जाळण्यात आले. अयोध्येत एका संताने तर कमालच केली. या संताने शाहरुखची चामडी सोलुन त्याला जाळणार असल्याचं म्हटलं होतं.

शेवटी या सगळ्या अडचणींवर मात करत पठाणचा ट्रेलर आता रिलीज झाला आहे. पठाणचा ट्रेलर युट्युबवर रिलीज होऊन 24 तास होतात न होतात तोवर 37 मिलीयन व्ह्यूज मिळाले आहेत.

युट्यूबवर असा प्रतिसाद मिळणं म्हणजे अत्यंत मोठी गोष्ट आहे. पठाणच्या विरोधाने शाहरुखच्या लोकप्रियतेवर कसलाच परिणाम झाला नाही असंच म्हणावं लागेल. कारण शाहरुख खान आणि दिपीका पदुकोणच्या या पठाणचा ट्रेलर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरला आहे.

'पठाण' हा यशराज फिल्म्स'चा बिग बजेट चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला होत असलेल्या विरोधामुळे ट्रेलर लांबणीवर पडलं असलं तरी चित्रपट मात्र ठरलेल्या तारखेलाच रिलीज होणार आहे.

Pathan Trailor
Sunny Deol Upcoming Movie : दिग्दर्शक राजकुमार संतोषी आणि सनी देओल 25 वर्षांनी पुन्हा एकत्र येणार ?

37 मिलीयन व्ह्यूज मिळवुन पठाणच्या ट्रेलरने हे सिद्धच केलं आहे कि शाहरुख हा अजुनही त्याच्या फॅन्ससाठी त्यांची पहिली पसंती आहे. युट्यूबवर रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये सुरूवातीला डिंपल कपाडिया दिसतात. देशाच्या गुप्तहेर विभागात अधिकारी असल्याचं समजु शकतं

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसल्याप्रमाणे जॉन अब्राहम या चित्रपटात व्हिलन असणार आहे. पठाणच्या भूमीकेत अर्थातच शाहरुख खान असणार आहे. जबरदस्त अॅ क्शनमुळे ट्रेलर चांगलाच मसालेदार बनला आहे.

शाहरुखचा "एक Soldier यह नहीं पूछता देश ने उसके लिए क्या किया, पूछता है वह देश के लिए क्या कर सकता है" हा डायलॉग चाहत्यांना चांगलाच आवडल्याचं दिसतंय.

कित्येक चाहत्यांनी शाहरुखचा हा डायलॉग कमेंटमध्ये लिहला आहे. थोडक्यात शाहरुख खानसाठी 2023 हे एका हिट चित्रपट देणारं असेल असं चित्र सध्या तरी दिसतंय

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com