Raj Kundra was arrested by Mumbai Police on Monday in pornography case
Raj Kundra was arrested by Mumbai Police on Monday in pornography case Twitter/@krish_jain24
मनोरंजन

राज कुंद्रा ला तीन दिवसांची पोलिस कोठडी; शिल्पा शेट्टीची ही होऊ शकते चौकशी

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा याला सोमवारी रात्री मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) अटक केली आहे. राज कुंद्रा (Raj Kundra) वर अश्लील चित्रपट बनविल्याचा आरोप आहे. राज कुंद्राला कोर्टाने 23 जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. जर अहवालांवर विश्वास ठेवला गेला तर आता मुंबई पोलिस या प्रकरणात शिल्पा शेट्टीची देखील चौकशी करू शकतात.

अहवालानुसार आता या प्रकरणात राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टीचीही चौकशी केली जाऊ शकते. मुंबई पोलिस लवकरच शिल्पाला चौकशीसाठी समन्स पाठवू शकतात. शिल्पा शेट्टी तिचा पती राज कुंद्राच्या बहुतेक व्यवसायात तिचा पार्टनर आहे, ज्यामुळे तिची चौकशी होऊ शकते.

सोमवारी मुंबईच्या गुन्हे शाखेने राज कुंद्रावर कित्येक तास चौकशी केली होती.चौकशीनंतर राजला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पहाटे चारच्या सुमारास त्याला वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आले. मेडिकलनंतर राजला मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या कार्यालयात नेण्यात आले. राज न्यायालयात मंगळवारी हजर झाला. त्यानंतर राज आणि त्यांच्या कंपनीचे आयटी हेड रायन थॉर्पे यांना कोर्टाने 23 जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. जेथे पुढील चौकशीसाठी त्याच्याकडे चौकशी केली जाईल. राज कुंद्राचा फोनही जप्त करण्यात आला आहे. ज्याची चौकशी केली जाईल आणि अधिक इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

रिपोर्ट्सनुसार राज कुंद्राने पॉर्न इंडस्ट्रीत सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. राज हा त्याच्या भावासोबत मिळून हा व्यवसाय करायचा. त्याचा हा भाऊ ब्रिटनमध्ये असून त्याच्याबरोबर त्याने कंपनी बनविली होती. या कंपनीचा व्यवसाय भारतात होता. भारतात या व्हिडिओंचे शूटिंग भारतात करण्यात आले आणि त्यानंतर वे ट्रान्सफर मार्गे यूकेला हस्तांतरित केले गेले. राज कुंद्राचे आयटी हेड रायन थॉर्पेला लिंक्स कसे पाठविले जात आहेत हे सर्व माहित होते. त्याला या संपूर्ण रॅकेटची माहिती होती.

शिल्पा शेट्टीच्या कामांबद्दल बोलताना ती 14 वर्षानंतर हंगामा 2 या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. या चित्रपटात तिच्यासोब परेश रावल, मीझान जाफरी आणि प्रणिता सुभाष मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 23 जुलैला डिज्नी प्लस हॉटस्टार रिलीज होणार आहे. या दिवसात शिल्पा तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT